
Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
कंपनीने ही स्मार्ट रिंग 39,999 रुपयांच्या किंमतीच लाँच केली होती. मात्र आता ही स्मार्ट रिंग सेलमध्ये 18,999 रुपयांच्या किंमतीत लिस्टेड आहे. त्यामुळे ग्राहकांना अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्ट रिंगच्या खरेदीवर सुमारे 20 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, अमेझॉन प्राइम सदस्यांना त्यांच्या 1,000 रुपयांच्या प्राइम कूपनचा आणि निवडक बँक कार्डवर 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळाल्यानंतर फक्त 15,999 रुपयांना ही अंगठी खरेदी करता येईल. म्हणजेच सेलमध्ये ग्राहकांना ही स्मार्ट रिंग अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. पण लक्षात ठेवा ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्ट रिंग खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गॅलेक्सी रिंग सॅमसंगच्या इकोसिस्टमसह काम करते. यामध्ये कोणताही डिस्प्ले दिलेला नाही. याच कारणामुळे ही रिंग यूजर्सची पहिली पसंती ठरली आहे. जे यूजर्स फोन आणि स्मार्टवॉचच्या नोटिफिकेशनमुळे कंटाळले आहेत, अशा यूजर्ससाठी ही रिंग एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा रिंग स्लीप ट्रॅकिंग, एक्टिविटी मॉनिटरिंग आणि फिटनेस इनसाइटला सपोर्ट करते आणि याचे डेटा सॅमसंगच्या हेल्थ प्लॅटफॉर्मवर सिंक होतो. रिंगची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत चालते. टायटॅनियमपासून बनलेली ही अंगठी विविध आकारात उपलब्ध आहे.
अॅमेझॉन सेलमध्ये केवळ सॅमसंग गॅलेक्सीवर रिंगवरच नाही तर आयफोनच्या खरेदीवर देखील बचत करण्याची संधी मिळणार आहे. अॅमेझॉन सेलमध्ये आयफोनसह विविध स्मार्टफोनच्या हजारो रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.