Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत
Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 39 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 4-इंच LTPO AMOLED कवर डिस्प्ले आणि Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोटोरोलाने हा जबरदस्त फ्लिप फोन 2024 मध्ये लाँच केला होता. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र आता अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Motorola Razr 50 Ultra स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 39,009 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 60,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्डवर ग्राहकांना 1,500 रुपयांपर्यंत 5% इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. याशिवाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म या फ्लिप स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,144 रुपये प्रति महीना असा ईएमआय पर्याय देखील ऑफर करत आहे. यासोबतच, डिव्हाईसवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे जिथून तुम्ही 42,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकता.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या या महागड्या डिव्हाईसमध्ये 4-इंच LTPO AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2400 निट्सपर्यंत आणि हा गोरिल्ला ग्लास विक्टसच्या प्रोटेक्शनसह येतो. फोन अनफोल्ड केल्यानंतर डिव्हाईस 6.9-इंच इनर डिस्प्ले ऑफर करतो, ज्याला 165Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळाला आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आहे.
फोटोग्राफीसाठी या दोन्ही फोनमध्ये Razr 50 Ultra मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50MP चा टेलीफोटो लेंस देखील दिली आहे. यासोबतच फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि 45W फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आण 5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील आहे.






