Samsung Galaxy S25 सीरीजसाठी रोलआऊट झाले Android 16 वाले लेटेस्ट One UI 8 अपडेट, या युजर्सना होणार फायदा
Samsung Galaxy S25 सीरीजना Android 16 वर आधारित लेटेस्ट One UI 8 ऑपरेटिंग सिस्टम (OS) अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे. सॅमसंगच्या कॉम्युनिटी मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, साऊथ कोरियामध्ये या अपडेटचा बीटा प्रोग्राम आता संपला आहे आणि ज्या युजर्सनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्या युजर्सना आता नवीन फ्रेमवेयर अपडेटसह One UI 8 चे स्टेबल वर्जन मिळणार आहे.
Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर
सॅमसंगने सर्वात आधी Galaxy Z6 सीरीजमधील स्मार्टफोन मॉडेल्ससाठी One UI 8 रिलीज केले होते. त्यानंतर आता कंपनी हे अपडेट दुसऱ्या स्मार्टफोन्ससाठी देखील रिलीज करण्याची तयारी करत आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या अशाच युजर्ससाठी अपडेट रिलीज केले जात आहे, ज्यांनी बीटा प्रोग्राममध्ये सहभाग घेतला होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
SamMobile ने त्यांच्या रिपोर्टममध्ये सॅमसंगच्या साउथ कोरिया वेबसाइटच्या कॉम्युनिटी पेजमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. यामध्ये कंपनीने अधिकृतपणे सांगितलं आहे की, सॅमसंगने त्यांच्या लेटेस्ट फ्लॅगशिप Galaxy S25 सीरीजसाठी One UI 8 अपडेट रिलीज करण्यास सुरुवात केली आहे. असं सांगितलं जात आहे की, सर्वात आधी Galaxy S25 सीरीजमधील One UI 8 Beta चा वापर करणाऱ्या युजर्सना हे अपडेट मिळणार आहे. बीटा वर्जन यूजर्ससाठी सॅमसंगने S93xNKSU5BYI3 अपडेट वर्जन लाँच केले आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी एस25 अल्ट्रा यूजर्ससाठी या फाईलचा आकार 555.45MB आहे. कंपनी लवकरच हे अपडेट नॉन-बीटा यूजर्ससाठी देखील जारी करणार आहे.
एकदा हे अपडेट युजर्ससाठी जारी करण्यात आलं की त्याबाबत नोटिफिकेशन पाठवले जाणार आहे. यूजर्स त्यांच्या फोनच्या सेटिंग्ज मेनूमध्ये जाऊन अपडेट जारी करण्यात आले आहे की नाही आणि त्यांच्या फोनसाठी हे अपडेट उपलब्ध झाले आहे की नाही हे तपासू शकतात. यासाठी, सॉफ्टवेअर अपडेट मॅन्युअली तपासावे लागेल. सध्या, हे अपडेट फक्त दक्षिण कोरियामध्ये उपलब्ध आहे. लवकरच ते इतर देशांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
One UI 8 अपडेटच्या ग्लोबली रोलआऊट करण्याबाबत असं सांगितलं जात आहे की, 18 सप्टेंबरनंतर हे अपडेट ग्लोबली रिलीज केलं जाऊ शकतं. जागतिक बाजारपेठेतही, हे अपडेट प्रथम Galaxy S25 सीरीजमधील डिव्हाईससाठी उपलब्ध असेल. यानंतर, कंपनी ते त्यांच्या सर्वात स्लिम फोन S25 Edge साठी उपलब्ध करून देईल. यानंतर, सप्टेंबरच्या अखेरीस Galaxy S24 मालिकेसाठी हे अपडेट जारी केले जाईल. सॅमसंगच्या Galaxy S23 मालिका आणि Galaxy S22 मालिकेला ऑक्टोबर महिन्यात हे अपडेट मिळेल.