Samsung Galaxy S25 FE: Samsung चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळणार दमदार प्रोसेसर
Samsung ने Galaxy S25 FE स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांचा हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनची भारतात देखील एंट्री झाली आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. Galaxy S25 चा हा अफोर्डेबल फोन अनेक हटके फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-हाउस Exynos 2400 चिपसेट, 4900mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Samsung ने त्यांचा नवीन स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB यांचा समावेश आहे. या व्हेरिअंटची किंंमत जाणून घेऊया. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 8 GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर स्मार्टफोनचे 256GB स्टोरेज व्हेरिअंट 65,999 रुपयांत लाँच करण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनच्या 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 77,999 रुपयांपासून सुरु होते. (फोटो सौजन्य – X)
लाँच ऑफर अंतर्गत ग्राहक 256GB व्हेरिअंटच्या किंमतीत 512GB व्हेरिअंट खरेदी करू शकणार आहेत. यासोबतच, सॅमसंग खरेदीदारांना 5000 रुपयांचा कॅशबॅक आणि 24 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय देखील देत आहे. सॅमसंगच्या Galaxy S25 FE स्मार्टफोनची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन Samsung India ची वेबसाइट, ऑफलाइन स्टोर आणि सॅमसंगच्या पार्टनर रिटेल आणि ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकणार आहेत. हा फोन नेव्ही, जेट ब्लॅक आणि व्हाईट रंगाच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि ब्राइटनेस 1900 निट्स आहे. या फोनची डिस्प्ले Vision Booster आणि Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शनला सपोर्ट करते. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Exynos 2400 चिपसेट, 8जीबी रॅम सपोर्टसह लाँच केला आहे.
हा फोन एंड्रॉयड 16 वर आधारित One UI 8 वर चालतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या नव्या स्मार्टफोनसाठी 7 वर्षांपर्यंतचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट रिलीज केलं जाणार आहे. Galaxy S25 सीरीजचा हा अफोर्डेबल फोन Google च्या Circle to Search, Gemini Live, आणि इतर एआई फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.
Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेंसर आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy S25 FE मध्ये 4900mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. आर्मर अॅल्युमिनियम ग्रेड फ्रेम असलेल्या या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4, GPS आणि USB टाइप-C कनेक्टिव्हिटी आहे.