Samsung Galaxy S25 Ultra: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! सेलपूर्वीच कमी झाली प्रिमियम स्मार्टफोनची किंमत, Deal मिस करू नका
तुम्ही देखील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अॅमेझॉन Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. ग्राहक त्यांचा ड्रिम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी या सेलची आतुरतेने वाट बघत आहेत. मात्र या सेलपूर्वीच कंपनीने मोठा धमाका केला आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra वर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहेत. त्यामुळे सेलपूर्वीच ग्राहकांना ड्रिम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
अॅमेझॉन गॅलेक्सी एस सीरीजच्या लेटेस्ट Samsung Galaxy S25 Ultra वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यामुळे फोनची किंमत खूप कमी झाली आहे. या डिव्हाईसमध्ये कंपनीने आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि जबरदस्त फोटोंसाठी उत्तम कॅमेरा सेटअप दिला आहे. चला आता या स्मार्टफोन डीलवर एक नजर टाकूया… (फोटो सौजन्य – Pinterest)
लवकरच अॅमेझॉन Great Indian Festival सेल सुरु होणार आहे. मात्र या सेलपूर्वीच सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्राच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजवाल्या व्हेरिअंटवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. कंपनीने हे डिव्हाईस 1,29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र ग्राहकांना आता हा स्मार्टफोन 1,07,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, कंपनी फोनवर विशेष बँक ऑफर देखील देत आहे, जिथून तुम्हाला Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 3,239 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते.
या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये कंपनीने 6.9 इंचाचा डायनामिक LTPO AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. तसेच स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील दिला आहे. डिव्हाइसमध्ये 2600 निट्सची कमाल ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. हे डिव्हाइस कॉर्निंग गोरिल्ला आर्मर 2 संरक्षणाने सुसज्ज आहे. याशिवाय, Samsung Galaxy S25 Ultra या फोनमध्ये Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 7 मिळत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, परफॉर्मन्ससाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर सॅमसंगच्या या अल्ट्रा डिव्हाईसमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 12MP का फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.