चार्जिंगची चिंता मिटणार? 9,000mAh बॅटरीसह नवा OnePlus स्मार्टफोन धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज... वाचा फीचर्स
लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा
चीनमध्ये नवीन वनप्लस स्मार्टफोन 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 3,699 युआन म्हणजेच सुमारे 53 हजार रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज आणि नोवा व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, चिनी ऑनलाईन स्टोअरच्या पेजवर हा फोन आधीच ‘सोल्ड आऊट’ (विक्रीसाठी उपलब्ध नाही) असे दाखवत आहे आणि तो पुन्हा कधी उपलब्ध होईल, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. (फोटो सौजन्य: X)
स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच फ्लॅट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनची ब्राइटनेस मॅक्सिमम 1,800 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोनमध्ये हाय-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम आणि डिसी-सारखी डिमिंग टेक्नोलॉजी देखील मिळणार आहे. डिव्हाईसची जाडी 8.5mm आहे.
फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. सध्या हा स्मार्टफोन केवळ 12GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 स्टोरेज पर्यायात उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग दिली आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर, X-एक्सिस मोटर, अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, आयआर ब्लास्टर आणि एनएफसी सारखे फीचर्स मिळणार आहेत.
नव्या वनप्लस टर्बो 6Vs स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनो सेंसर मिळणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
Lava च्या ग्राहकांना मोठा धक्का! स्मार्टफोन खरेदी महागणार, 15 नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन किंमती
डिव्हाईसमध्ये 9,000mAh बॅटरी दिली आहे. यामध्ये 80W वायर्ड चार्जिंग, 27W पर्यंत रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि ‘बायपास चार्जिंग’ सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.
Ans: वनप्लस टर्बो 6Vs स्मार्टफोन चीनमध्ये 3,699 युआन म्हणजेच सुमारे 53 हजार रुपये किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
Ans: या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
Ans: या स्मार्टफोनमध्ये तब्बल 9,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 80W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.






