Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Samsung: सॅमसंग भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S26 ची किंमत १२ हजार रुपयांनी वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अशा वावड्या उठल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 18, 2026 | 10:35 AM
Samsung वाढवणार Samsung Galaxy S26 च्या किमती (फोटो सौजन्य - Samsung)

Samsung वाढवणार Samsung Galaxy S26 च्या किमती (फोटो सौजन्य - Samsung)

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग आता Galaxy S26 ची किंमत वाढविण्याच्या तयारीत 
  • तब्बल १२ हजार रुपयांनी महागणार मॉडेल
  • नक्की आता भारतात किती रुपयांना मिळणार 
Samsung: मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग भारतात गॅलेक्सी एस२६ (Galaxy S26) ची किंमत वाढवण्याच्या तयारीत आहे. एका टिपस्टरने दावा केला आहे की, उपलब्ध असलेले दोन्ही स्टोरेज व्हेरिएंट्स ₹१२,००० पर्यंत महाग होऊ शकतात. ही कथित दरवाढ अशा वेळी होत आहे, जेव्हा सॅमसंगच्या इतर फ्लॅगशिप आणि फोल्डेबल मॉडेल्सच्या संभाव्य दरवाढीची चर्चाही सुरू आहे. 

गॅलेक्सी एस२६ अल्ट्रा (Galaxy S26 Ultra), गॅलेक्सी झेड फोल्ड ८ (Galaxy Z Fold 8) आणि गॅलेक्सी झेड फोल्ड ८ अल्ट्रा (Galaxy Z Fold 8 Ultra) यांच्याही किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र या बदलांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही. सॅमसंगने यापैकी कोणत्याही कथित दरवाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

पोस्टमध्ये केलाय दावा 

सॅमसंग गॅलेक्सी एस२६ (Samsung Galaxy S26) ची किंमत भारतात वाढण्याची शक्यता असल्याचा टिपस्टर संजू चौधरी (@saaaanjjjuuu) यांनी एका पोस्टमध्ये दावा केला आहे. सॅमसंग भारतात गॅलेक्सी एस२६ (Galaxy S26) ची किंमत वाढवू शकते. अहवालानुसार, 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹87,999 वरून ₹99,999 पर्यंत वाढू शकते, तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत ₹1,07,999 वरून ₹1,19,999 पर्यंत वाढू शकते.

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सध्या गॅलेक्सी S26 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹79,999 आणि 12GB + 512GB मॉडेलची किंमत ₹99,999 आहे. हा अहवाल लिहीपर्यंत, या कथित नवीन किमती कंपनीच्या वेबसाइटवर अद्याप दिसलेल्या नाहीत.

Price hike alert 🚨
Samsung to increase the price of Galaxy S26 by upto ₹12k:
12/256GB: ₹87,999 → ₹99,999
12/512GB: ₹1,07,999 → ₹1,19,999
The Galaxy S26 Ultra also might end up being priced similarly to the iPhone 18 Pro. pic.twitter.com/p7uFXa2jEj — Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) September 17, 2026

गॅलेक्सी S26 अल्ट्रादेखील होऊ शकतो महाग 

गॅलेक्सी S26 च्या संभाव्य दरवाढीचीही बातमी समोर आली आहे. गॅलेक्सी S26 अल्ट्रा देखील भारतात महाग होऊ शकतो या अलीकडील दाव्यानंतर आली आहे. तथापि, नवीन किमती आणि त्या लागू होण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. Galaxy Z Fold 8 आणि Galaxy Z Fold 8 Ultra यांच्या किंमतीतही वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे, परंतु या दरवाढीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

त्या टिपस्टरने असेही सांगितले की, गॅलेक्सी एस२६ अल्ट्राची किंमत लवकरच देशात iPhone 18 Pro च्या किंमतीइतकी होऊ शकते. ॲपलच्या नवीनतम प्रो मॉडेलची किंमत भारतात ₹1,64,900 पासून सुरू होते. सॅमसंगच्या फ्लॅगशिप मॉडेलची सध्याची सुरुवातीची एमआरपी ₹1,39,999 आहे.

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

नवे पेमेंटचे पर्यायही जाहीर 

सॅमसंगने अलीकडेच भारतात Galaxy Z Fold 8 Ultra आणि Galaxy Z Fold 8 साठी 24 महिन्यांचा ‘गॅलेक्सी फॉरएव्हर’ नावाचा नवीन पेमेंट पर्याय जाहीर केला आहे. या योजनेअंतर्गत, ग्राहक फोनच्या किंमतीपैकी 60% रक्कम ईएमआयद्वारे भरतात, तर उर्वरित 40% रक्कम मुदतीच्या अखेरपर्यंत पुढे ढकलली जाते. यामुळे गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्राचा मासिक ईएमआय 9,417 रुपयांवरून 6,997 रुपयांपर्यंत कमी होतो, तर गॅलेक्सी झेड फोल्ड 8 चा ईएमआय 8,584 रुपयांवरून 6,416 रुपयांपर्यंत कमी होतो.

Web Title: Samsung galaxy s26 price hike in india 12000 increased across storage variants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
1

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
2

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
3

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
4

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.