
Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
दिग्गज टेक कंपनी सॅमसंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या S सिरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत आहे. ही सिरीज Samsung Galaxy S26 या नावाने लाँच केली जाण्याची शक्यता असून या सिरीजअंतर्गत कंपनी गॅलेक्सी S26, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 अल्ट्रा हे तीन डिव्हाईस लाँच करण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, यावेळी सिरीजमधील प्रिमियम डिव्हाईस गॅलेक्सी S26 अल्ट्रामध्ये काही मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. कंपनी विशेषत: स्मार्टफोनचा कॅमेरा, परफॉर्मेंस आणि Ai फीचर्सवर जास्त भर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडिया आणि सतत समोर येत असलेल्या रिपोर्टवरून स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत आणि त्यांच्या लाँच डेटबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत. याबाबत आता जाणून घेऊया.
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रा सीरीज पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनीने 25 फेब्रुवारी रोजी सैन फ्रांसिस्कोमध्ये त्यांच्या गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंटचे आयोजन केले आहे. हा ईव्हेंट कंपनीच्या इतर टाईमलाईनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कंपनीने त्यांची गॅलेक्सी एस25 सीरीज जानेवारी महिन्यात लाँच केली होती. मात्र यावेळी कंपनी त्यांची नवीन सिरीज उशीरा लाँच करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S26 Ultra मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स दिले जाणार आहेत, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र याबाबत काही लीक्स समोर आले आहेत. Samsung Galaxy S26 Ultra मध्ये यावेळी अनेक अपग्रेड दिले जाण्याची शक्यता आहे. जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर यावेळी डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेससह 6.9 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 एलीट जनरेशन 5 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 16GB LPDDR5X रॅमसह 256GB स्टोरेज वाला बेस व्हेरिअंट देखील दिला जाऊ शकतो.
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
कंपनीच्या या आगामी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 60W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा अल्ट्रावाइड आणि 50MP चा 5x टेलीफोटो कॅमेरा, सह 10MP चा टेलीफोटो लेंस दिला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.
अलीकडेच हार्यवेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झााली आहे. याच कारणामुळे यावेळी सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्राची किंमत वाढण्याची शक्यता आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला तर, Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत 135,000 ते 1,40,000 रुपयांदरम्यान असू शकते. मात्र कंपनीने याची पुष्टी केलेली नाही.
Ans: जुना फोनमधील डेटा नवीन Samsung मध्ये सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करण्यासाठी Samsung चे अधिकृत टूल.
Ans: Samsung चा सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे जो डेटा प्रोटेक्शन, सिक्युर फोल्डर आणि डिव्हाइस एन्क्रिप्शन प्रदान करतो.
Ans: बहुतेक फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये IP68 रेटिंग असते, तर मिड-रेंजमध्ये IP67 किंवा स्प्लॅश-रेझिस्टंट डिझाइन असते.