UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
या भागिदारीबाबत अधिक माहिती देत PhonePe ने सांगितलं आहे की, कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. याशिवाय खरेदी करताना युजर्सना अधिक चांगले आणि विचार करून निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या भागिदारीमुळे फोनपे युजर्सना फोनपे कंज्यूमर्स अॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अॅपद्वारे थेट चॅटजीपीटीच्या अॅडवांस्ड एआई सर्विसचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)
तथापी, संपूर्ण चॅटबॉट इंटरफेस फोनपेचे कंज्यूमर अॅप आणि फोनपे फॉर बिजनेस अॅपद्वारे अॅक्सेस केले जाऊ शकणार नाही. मात्र तरी देखील युजर्सना पूर्ण प्लॅटफॉर्मवर चॅटजीपीटी-बेस्ड एक्सपीरिएंस मिळणार आहे. पोस्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, AI असिस्टेंट यूजर्सना त्यांच्या पुढील प्रवासाचे नियोजन करण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंत रोजच्या कामांसंबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी मदत करणार आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही पहिली पेमेंट नाही ज्यांनी AI दिग्गजसोबत भागिदारी केल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये रेजरपेने घोषणा केली होती की, त्यांनी चॅटजीपीटीवर एजेंटिक AI-आधारित यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारात आणण्यासाठी ओपनएआई आणि भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI) सोबत भागिदारी केली होती.
एका प्रेस रिलीजमध्ये फोनपेने या AI दिग्गजसह सहकार्याची घोषणा केली आणि सांगितलं की, या निर्णयाचा उद्देश देशात चॅटजीपीटीचा आपलेपणा वाढवणं आणि यासोबतच ‘परस्पर व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देणे’ असा आहे. या करारांतर्गत, UPI प्लॅटफॉर्म अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये युजर्सच्या मदतीसाठी चॅटजीपीटीच्या सुविधा इंटीग्रेट करणार आहे.
ओपनएआयचे आंतरराष्ट्रीय धोरण प्रमुख ऑलिव्हर जे यांनी सांगितलं आहे की, “देशभरातील लोकांसाठी एआय अधिक सुलभ करण्याच्या आमच्या ध्येयात फोनपे सोबतचा आमचा सहयोग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत नाविन्यतेचे एक जागतिक केंद्र आहे आणि फोनपेला देशाच्या फॅब्रिक आणि त्याच्या यूजर्स आधाराची सखोल समज असल्याने ते एक आदर्श पार्टनर बनते.” ओलिवर जे यांनी असं देखील सांगितलं आहे की, ही भागीदारी भारतातील यूजर्सना एआयचे अफाट मूल्य दाखवून देईल, याच्या मदतीने लाखो ग्राहकांना त्यांचे दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होणार आहे.
Ans: अॅपमध्ये बँक खाते लिंक करून, MPIN सेट केल्यानंतर आपोआप UPI ID तयार होते.
Ans: UPI ID, QR कोड, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट डिटेल्स वापरून पैसे तत्काळ पाठवू शकता.
Ans: साधारणपणे 24–48 तासात पैसे परत येतात.






