CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज...
कंपनीने सादर केलेल्या या डिव्हाईसमध्ये 8.1-इंचाची इनर स्क्रीन आणि 6.6-इंचाची कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Moto Pen Ultra स्टाइलस चा सपोर्ट देखील मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या या आगामी डिव्हाईसमध्ये ऑन-डिवाइस AI फीचर्स देखील आहेत. या आगामी फोनमध्ये कोणते खास फीचर्स दिले याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Motorola च्या पहिल्या फोल्ड फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या Razr Fold मध्ये दोन कलर ऑप्शन मिळणार आहेत. ज्यामध्ये पँटोन ब्लैकेन्ड ब्लू आणि पँटोन लिली व्हाइट कलर यांचा समावेश असणार आहे. डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर फोल्ड फोनमध्ये राउंड कॉर्नर, हिंज आणि एक रियर कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन मोटोरोलाच्या सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनच्या डिझाईनसारखाच दिसत आहे.
फ्रंट कॅमेरासाठी बाहेरील स्क्रीनवर मधोमध एक होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा अंतर्गत डिस्प्लेच्या एका कोपऱ्यात बसवला आहे. मोटोरोला स्मार्टफोनच्या या डिव्हाईसमधझ्ये 2K रिजॉल्यूशन वाला 8.1-इंच LTPO इनर डिस्प्ले आणि 6.6-इंचाची एक्सटर्नल स्क्रीन आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Motorola Razr Fold मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे.
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
Motorola Razr Fold मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYTIA प्राइमरी सेंसर, 3x ऑप्टिकल झूमवाला 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आाल आहे. डिव्हाईसच्या कव्हर स्क्रीनवर 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि प्रायमरी डिस्प्लेवर 20-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेबल डिव्हाईसमध्ये Dolby Vision व्हिडीओ रिकॉर्डिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.






