CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
यूरोपमध्ये 256GB स्टोरेज आणि बंडल एक्सेसरीजवाल्या TCL Nxtpaper 70 Pro ची किंमत EUR 339 म्हणजेच सुमारे 35,800 रुपये आहे. तर बंडल एक्सेसरीजवाल्या 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 389 म्हणजेच सुमारे 41,100 रुपये आहे. हा स्मार्टफोन नेबुलर गोल्ड आणि स्टेलर ब्लू फिनिशमध्ये उपलब्ध आहे. TCL Nxtpaper 70 Pro स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन यूरोप, एशिया-पैसिफिक, नॉर्थ अमेरिका, मिडिल ईस्ट आणि अफ्रीका आणि लॅटिन अमेरिकामध्ये उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
The Ultimate Phone for Your Eyes: The new TCL NXTPAPER 70 Pro is your solution to countless hours of screen time, dry eyes and mental fatigue: – Anti-glare NXTPAPER 4.0 display = No Squinting
– TruePaper Restoration Tech = Smooth & Soft Viewing
– Dim-light Protection = Safer… pic.twitter.com/nqh1yExO7B — TCL Mobile (@TCLMobileGlobal) January 6, 2026
TCL Nxtpaper 70 Pro चे मुख्य डेडिकेटेड Nxtpaper Key आहे. हे फिजिकल बटन यूजर्सना तीन डिस्प्ले मोड्स बदलण्याची सुविधा देतो. कलर पेपर मोडमध्ये फुल-कलर डिस्प्ले पाहायला मिळतो. तर इंक पेपर मोडमध्ये वाचनासाठी रंग आउटपुट कमी करतो. मॅक्स इंक मोड डिस्प्लेला मोनोक्रोम बनवतो ज्यामुळे वाचनामधील विचलितता कमी होते. TCL ने दावा केला आहे की, मॅक्स इंक मोडमध्ये Nxtpaper 70 Pro 7 दिवसांपपर्यंत रीडिंग आणि 26 दिवसांपपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करतो. या मोडमध्ये एक प्रीइंस्टॉल्ड बुक लाइब्रेरी आणि अनेक AI रीडिंग टूल्स जसे AI आउटलाइन, AI Q&A, AI ऑडियोबुक, आणि AI पॉडकास्ट देण्यात आले आहे. यूजर्स ब्राउजिंग, स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी कोणत्याही वेळी फुल-कलर डिस्प्लेवर स्विच करू शकतात.
TCL Nxtpaper 70 Pro ऑप्शनल लो-लेटेंसी, प्रेशर-सेंसिटिव T-Pen सह जोडल्यानंतर स्टाइलस इनपुटला देखील सपोर्ट करतो. हे नैसर्गिक हँडराइटिं अनुभव देतो. यासोबतच यामध्ये ऑफ-स्क्रीन मेमो, AI हँडराइटिंग इनपुट आणि AI-जेनरेटेड कवर किंवा बुलेट जर्नल सारखे फीचर्स देखील दिले आहेत. TCL ने हे डिव्हाईस काम, क्रिएटिविटी आणि एंटरटेनमेंटसाठी ऑल-इन-वन टूल म्हणून सादर केले आहे. दिर्घकाळ वापर केल्यानंतर देखील डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी TCL Nxtpaper 70 Pro ला TÜV आणि SGS सर्टिफिकेशन मिळाले आहे.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, या डिव्हाईसमध्ये सात कोर आई-केयर टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड आहे. यामध्ये नेचुरल लाइट डिस्प्ले, DC डिमिंगद्वारे झिरो फ्लिकर, ब्लू लाइट प्यूरिफिकेशन, रिफ्लेक्शन-फ्री आणि एंटी-ग्लेयर व्यूइंग, डिम-लाइट आई प्रोटेक्शन, सर्कैडियन स्क्रीन कम्फर्ट आणि TruePaper रेस्टोरेशन टेक्नोलॉजी समाविष्ट आहे. TCL चं असं म्हणणं आहे की, हे हँडसेट डिस्प्ले सर्कुलर पोलराइज्ड लाइटचा वापर करते. TCL Nxtpaper 70 Pro मध्ये 1.0um सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देखील आहे. TCL Nxtpaper 70 Pro मध्ये 5,200mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.






