Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा आणि गॅलेक्सी टॅब एस११ लाँच केले आहे. कंपनीने या डिव्हाईसच्या माध्यमातून सर्वात इंटेलिजंट व प्रगत टॅब्लेट अनुभव वितरित केला आहे. गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज चालती-फिरती प्रभावी प्रोडक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रो-ग्रेड हार्डवेअरसह मोठी स्क्रिन देण्यात आली आहे. गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा आतापर्यंतचा सर्वात सडपातळ गॅलेक्सी टॅब आहे. गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा फक्त ५.१ मिमी जाड आहे आणि वजन फक्त ६९२ ग्रॅम आहे, तुलनेत त्याच्या पूर्वीच्या टॅब्लेटची जाडी ५.५ मिमी आणि वजन ७१८ ग्रॅम आहे.
iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड
वन यूआय ८ सह गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज मल्टीमोडल एआयला प्रकाशझोतात आणते. हे टूल युजर्स टाइप करणाऱ्या, म्हणणाऱ्या व पाहणाऱ्या गोष्टींना समजून घेते. हे टूल्स काम करण्यासाठी, कंटेट निर्माण करण्यासाठी आणि सहजपणे टास्क्स पूर्ण करण्यासाठी सोईस्कर मार्ग देतात. टॅब एस११ सिरीज जेमिनी लाइव्हसह लाँच करण्यात आले आहे, जे रिअल-टाइम स्क्रिन शेअरिंग व व्हिज्युअल इनपुट देते. स्क्रिनवरील कंटेट असो किंवा कॅमेऱ्याद्वारे एखादी वस्तू दाखवायची असो, जेमिनी लाइव्ह टूल युजर्स पाहत असलेल्या गोष्टी जाणून घेत संदर्भीय प्रश्नं व विनंत्यांची हाताळणी करू शकते. उदाहरणार्थ, वर्गामध्ये युजर्स सहजपणे त्यांचे नोट्स स्क्रिनवर शेअर करू शकतात.
साइड बटन प्रेस करून होल्ड करत युजर्स जेमिनी कार्यान्वित करू शकतात आणि सिंगल कमांडसह अॅप्समध्ये कमांड्स चालवू शकतात. उदाहरणार्थ, मोठे लेख वाचण्यासाठी वेळ नसल्यास युजर्स जेमिनीसह लिंक शेअर करू शकतात आणि म्हणू शकतात की ‘या लेखाचे संक्षिप्त रूप करा आणि सॅमसंग नोट्समध्ये सेव्ह करा’. यामुळे युजर्सना जेव्हा गरज असेल तेव्हा ते पाहू शकतील.
युजर्स ड्रॉईंग असिस्टसह कच्च्या रेखाचित्रांना आकर्षक व्हिज्युअल्समध्ये बदलू शकतात, त्यानंतर सॅमसंग नोट्समध्ये त्यांनी तयार केलेल्या फोटोंमध्ये समाविष्ट करू शकतात. राइटिंग असिस्ट स्टाइलला बदलण्यास मदत करते, ज्यामुळे वापरकर्ते लेखनामध्ये सुधारणा करत ईमेल, डॉक्यूमेंट किंवा इतर अॅप्समध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्यांचा खरा हेतू स्पष्ट करू शकतात. सर्कल टू सर्च विथ गुगल आता संदर्भ मिळण्यासाठी आणि डिवाईसच्या स्क्रिनवर दिसणाऱ्या गोष्टींबाबत अधिक माहितीसाठी अधिक उपयुक्त आहे.
गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज नवीन रिडिझाइन केलेल्या एस पेनसह लाँच करण्यात आली आहे, जो केंद्रित कामकाज आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामधील नवीन शंकू-आकाराचे पेनाचे टोक सर्वोत्तम नियंत्रणासाठी तिरप्या कोनांवर साह्य करते, तर षटकोनी डिझाइन अधिक नैसर्गिक, एर्गोनॉमिक अनुभव देते, जी हातामध्ये आरामदायी व स्थिर राहते. क्विक टूल्स ड्रॉईंग काढताना किंवा फ्लोटिंग अॅक्सेससह एडिटिंग करताना सुलभ सुविधा देतात, तर स्टिकी नोट्स वापरकर्त्यांना अचानक येणारे विचार किंवा यादी प्रत्यक्ष सॅमसंग नोट्समध्ये भर करण्यास मदत करते, जेथे डॉक्यूमेंटचे पुनरावलोकन करताना अॅप स्विच करण्याची गरज भासत नाही.
गॅलेक्सी एआय व्यतिरिक्त गॅलेक्सी टॅब एस११ सिरीजमधील सुधारित सॅमसंग डीईएक्स वापरकर्त्यांना अॅप्समध्ये मल्टीटास्किंगच्या वेळी त्यांची उत्पादकता वाढवण्यास, तसेच मीटिंग्जदरम्यान नोट्स घेण्यास किंवा संकल्पना व्यक्त करण्यास सक्षम करते. तुम्ही व्हिज्युअल संकल्पना तयार करणारे डिझाइनर असो किंवा अॅप्स व डिस्प्लेवर ट्रिपचे नियोजन करणारे पर्यटक असो गॅलेक्सी टॅब एस११ सिरीजमध्ये रिसर्चिंग व स्केचिंगपासून सुधारित निष्पत्ती शेअर करण्यापर्यत सर्वकाही आहे. नवीन सॅमसंग डीईएक्स अपग्रेड्स उच्च स्तरीय उत्पादकता देतात, ज्याची सुरूवात एक्स्टेण्डेड मोडसह होते, जे गॅलेक्सी टॅब एस११ आणि बाह्य मॉनिटरला विनासायास ड्युअल-स्क्रिन सेटअपमध्ये बदलते.
अपग्रेडेड सॅमसंग डीईएक्ससह वापरकर्ते प्रेझेन्टेशनसाठी मीटिंग रूम टीव्हीशी कनेक्ट व्हायचे असो किंवा सुट्टीवर जाण्यापूर्वी एअरपोर्ट लाऊंजवर वर्क डॉक्युमेंटला शेवटचे फिनिशिंग द्यायचे असो कुठूनही व्हर्च्युअली काम करू शकतात. बुक कव्हर कीबोर्ड स्लिम असलेली गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज सहजपणे वैयक्तिकृत, मोबाइल वर्कस्टेशनमध्ये बदलते, तसेच समर्पित गॅलेक्सी एआय कीच्या माध्यमातून त्वरित एआय असिस्टण्ट्स उपलब्ध करून देते.
गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज आतापर्यंतची सर्वात प्रगत कार्यक्षमता देते. या सिरीजच्या स्लिम, अत्यंत पोर्टेबल डिझाइनमध्ये अत्याधुनिक हार्डवेअर आणि सर्वोत्तम व्हिज्युअल्स आहेत. सॅमसंगने पहिल्यांदाच एस११ सिरीजमधील गॅलेक्सी टॅबमध्ये सुधारित ३एनएम प्रोसेसरची भर केली आहे, ज्यामधून गतीशील प्रोसेसिंग, सुलभ मल्टीटास्किंग आणि अधिक प्रतिसादात्मक एआय वैशिष्ट्ये मिळतात. गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्राच्या एनपीयूमध्ये ३३ टक्के, सीपीयूमध्ये २४ टक्के आणि जीपीयूमध्ये २७ टक्के कार्यक्षमता सुधारण्यात आली आहे.
गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज आजपासून प्री-ऑर्डर्ससाठी उपलब्ध असेल. नवीन टॅब एस११ सिरीज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना ४५ वॅट ट्रॅव्हल अॅडप्टर मोफत मिळेल. गॅलेक्सी टॅब एस११ सिरीजची किंमत ७४९९९ रूपयांपासून सुरू होते आणि ग्रे व सिल्व्हर या दोन रंगांमध्ये येते. ग्राहक Samsung.com, सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, निवडक सॅमसंग अधिकृत रिटेल स्टोअर्स आणि इतर ऑनलाइन पोर्टल्सवर नवीन गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज खरेदी करू शकतात. गॅलेक्सी टॅब एस११ सिरीज ९-महिने नो-कॉस्ट बँक ईएमआयसह उपलब्ध आहे, तसेच डिवाईसेस एनबीएफसीच्या माध्यमातून फायनान्स केले असल्यास २४-महिन्यांच्या ईएमआयसह देखील येते.