Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं… क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस

तुम्ही आतापर्यंत मोबाईल फोन चोरीच्या बातम्या ऐकल्या असतीलच. पण, लंडनमधून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. आता Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकची चोरी झाली आहे. या ट्रकमध्ये अनेक डिव्हाईस होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 06, 2025 | 12:12 PM
Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं... क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस

Samsung च्या 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकवर चोरांची नजर, संधी मिळताच केलं असं... क्षणातच लुटले 91 करोड रुपयांचे डिव्हाईस

Follow Us
Close
Follow Us:
  • 12000 स्मार्टफोन्सनी भरलेल्या ट्रकची चोरी
  • 91 करोड रुपयांचे डिव्हाईस चोरांनी लुटले
  • लंडनमध्ये घडली घडना

स्टेशनवर किंवा एखाद्या रस्त्यावर स्मार्टफोन चोरी होण्याच्या घटना सर्रास घडत असतात. चोरं एखाद्या माणसाच्या नकळत त्याच्या खिशातून स्मार्टफोन चोरी करतात आणि नंतर तो स्मार्टफोन चोर बाजारात किंवा एखाद्या दुकानदाराला विकतात. एक किंवा दोन स्मार्टफोन चोरी होण्याच्या घटना अत्यंत सामान्य आहेत. पण जर स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रकच चोरी झाला तर… वाचून धक्का बसला ना! आता अशीच एक घटना लंडनमध्ये घडली आहे.

BSNL यूजर्सना झटका! कंपनीने कमी केली या प्लॅनची व्हॅलिडीटी, कोणत्या रिचार्ज प्लॅन्सचा समावेश , जाणून घ्या

लंडनमध्ये चक्क सॅमसंगच्या स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रक चोरी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील Heathrow Airport जवळ सॅमसंगच्या लेटेस्ट फोल्ड स्मार्टफोन्सनी भरलेला ट्रक चोरी झाला आहे. या ट्रकमध्ये Samsung Galaxy Z Flip 7 आणि Galaxy Z Fold 7 सह अनेक लेटेस्ट स्मार्टफोन्स आणि अन्य डिव्हाईस होते. या ट्रकमध्ये एकूण 12 हजार स्मार्टफोन्स असल्याचं सांगितलं जात आहे. असं सांगितलं जात आहे की, या सर्व डिव्हाईसची किंमत तब्बल 91 करोड रुपये आहे. या चोरीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 12 हजार स्मार्टफोन्सच्या चोरीच्या घटनेने सर्वच कंपन्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.  (फोटो सौजन्य – istockphoto) 

मीडिया रिपोर्टनुसार, सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला एक ट्रक विमानतळावरून गोदामात जात असताना ही चोरी झाली. या ट्रकमध्ये Galaxy Z Fold 7 चे 5,000 युनिट्स, Galaxy Z Fold 7 चे 5,000 युनिट्स आणि Galaxy Watch 8 चे 5,000 युनिट्स होते. या घटनेमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही चोरी कशी झाली, पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे का, एकूण किती रुपयांचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

एका अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, ट्रकमध्ये सॅमसंगच्या Galaxy S25 सीरीज आणि Samsung Galaxy A16 स्मार्टफोनचा देखील समावेश होता. या फिल्मी स्टाईल चोरीमध्ये 91 कोटी रुपयांचे सॅमसंग डिव्हाइस चोरीला गेल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. एवढी मोठी चोरी होण्याची ही पहिलीच घटना नसली तरी देखील या चोरीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने मोबाईल चोरी होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये हजारो स्मार्टफोन्स आणि त्यांच्या पार्ट्सची चोरी झाली आहे. 2020 च्या सुरुवातीला भारतात सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनचे काही पार्ट्स चोरीला गेले होते. त्यानंतर नोएडा येथील एका कारखान्यातून सुमारे 3.30 लाख डॉलर्स किमतीचे काही पार्ट्स चोरीला गेले होते. या प्रकरणात नोएडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती.

2023 मध्ये अमेरिकेतील Apple स्टोअरमधून फिल्मी स्टाईल चोरी झाली होती. चोरांनी Apple स्टोअरमध्ये एक बोगदा खोदला. यामध्ये चोरांनी 436 आयफोन चोरले, ज्यांची किंमत सुमारे 4 कोटी रुपये होती. वृत्तानुसार, चोरांनी जवळच्या कॉफी शॉपच्या बाथरूममधून Apple स्टोअरमध्ये एक बोगदा बनवला होता. या सर्व घटनानंतर आता पुन्हा एकदा स्मार्टफोन चोरीची एक मोठी घटना घडली आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

चोरी झालेल्या ट्रकमध्ये कोणते डिव्हाईस होते?
Samsung Galaxy Z Flip 7, Galaxy Z Fold 7, Galaxy Watch 8

कोणत्या देशात घडली अजब घटना?
लंडन

Web Title: Samsung phones worth rs 91 crore stolen from truck in london according to media reports tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.