Samsung च्या सातव्या जनरेशन फोल्डेबल्स प्री-ऑर्डर्सनी रचला इतिहास, भारतात स्मार्टफोन्ससाठी स्थापित केला नवीन बेंचमार्क
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने आज एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने अलीकडेच गॅलेक्सी झेड फोल्ड७, गॅलेक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप७ एफई स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोन्सने विक्रमी प्री-ऑर्डर्सची नोंद केली आहे आणि एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड७, झेड फ्लिप७ आणि झेड फ्लिप७ एफई भारतात 9 जुलै रोजी लाँच करण्यात आले होते. स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑर्डर्स सुनिश्चित केल्या.
प्री-ऑर्डर्सच्या रेकॉर्डमुळे ब्रँडच्या सातव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी ग्राहकांमध्ये मोठी मागणी आणि उत्साह दिसून येतो. गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई या स्मार्टफोन्सनी पहिल्या ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑर्डर्स सुनिश्चित करत मागील विक्रम मोडला. या कामगिरीनंतर सातव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्सनी या वर्षाच्या सुरूवातीला गॅलेक्सी एस२५ सिरीजसाठी मिळालेल्या प्री-ऑर्डर्सला टक्कर दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पर्क म्हणाले की, “आमच्या ‘मेड इन इंडिया’ फोल्डेबल स्मार्टफोन्ससाठी विक्रमी प्री-ऑर्डर्ससह आमचा विश्वास दृढ झाला आहे. भारतातील तरूण ग्राहक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. गॅलॅक्सी झेड फोल्ड७ हा आतापर्यंतचा सर्वात प्रगत स्मार्टफोन मानला जात आहे. हा स्मार्टफोन शक्तिशाली, आकर्षक, सर्वोत्तम व पोर्टेबल आहे. नवीन वन यूआय ८ आणि आऊट ऑफ द बॉक्स अँड्रॉईड १६ ची शक्ती यामुळे हा स्मार्टफोन आणखी खास बनतो. नवीन डिवाईसेसचे यश आमच्या मोठ्या ध्येयासाठी आधारस्तंभ आहे.”
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये अचूक रचना व शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत. हा स्मार्टफोन आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका फोन आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड७ चे वजन फक्त २१५ ग्रॅम आहे आणि हा स्मार्टफोन एस२५ अल्ट्रापेक्षा वजनाने हलका आहे. फोल्ड केल्यानंतर या स्मार्टफोनची जाडी फक्त ८.९ मिमी आणि अनफोल्ड केल्यानंतर ४.२ मिमी आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये नवीन फ्लेक्सविंडो आहे. या स्मार्टफोनमध्ये गॅलॅक्सी एआयसह एज-टू-एज फ्लेक्सविंडो, उच्च स्तरीय कॅमेरा आणि अत्यंत सुसंगत व प्रख्यात डिझाइन देण्यात आली आहे. फोनची किंमत देखील कमी आहे, त्यामुळे गॅलॅक्सी झेड फ्लिप७ सर्वसामान्यांना परवडणारा फोन आहे. १३.७ मिमी जाडी असलेला गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आतापर्यंतचा सर्वात स्लिम गॅलॅक्सी झेड फ्लिप आहे.
ब्ल्यू शॅडो, सिल्व्हर शॅडो आणि जेट ब्लॅक अशा आकर्षक रंगांमध्ये गॅलॅक्सी झेड फोल्ड७ लाँच करण्यात आला आहे. तर गॅलॅक्सी झेड फ्लिप७ ब्ल्यू शॅडो, जेट ब्लॅक आणि ओरल रेड या लाँच करण्यात आला आहे. ब्लॅक व व्हाइट रंगांमध्ये गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई लाँच करण्यात आला आहे. याशिवाय ग्राहकांना मिंट पर्याय पाहिजे असेल तर ग्राहक Samsung.com वरून गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ खरेदी करू शकतात. दोन्ही डिवाईसेस AI फीचर्सनी सुसज्ज आहेत. गुगलच्या जेमिनी लाइव्हसह युजर्स रिअल टाइममध्ये त्यांच्या स्क्रिनवर शेअर करू शकतात. याशिवाय युजर्स एआय असिस्टण्टसह संवाद साधू शकतात.