Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी घरी येणार का? आणि मीटर बदलल्यानंतर अचानक वीजबिल वाढू शकते का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आज इथे पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 20, 2026 | 06:42 PM
स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
Follow Us
Follow Us:
  • स्मार्ट मीटरचे रीडिंग दूरस्थपणे घेतले जाऊ शकते, त्यामुळे प्रत्येक वेळी कर्मचारी घरी येण्याची गरज राहत नाही.
  • स्मार्ट मीटर बसवल्याने वीजदर आपोआप वाढत नाही; प्रत्यक्ष वापर आणि लागू टॅरिफनुसार बिल तयार होते.
  • केंद्राच्या नियमांनुसार स्मार्ट मीटरचे रीडिंग दिवसातून किमान 1 वेळा दूरस्थपणे घेण्याची तरतूद आहे.
महाराष्ट्रात वीज मीटरच्या डिजिटलायझेशनमुळे स्मार्ट मीटरची चर्चा वाढली घरोघरी आहे. पारंपारिक मीटरमध्ये कर्मचारी ठराविक कालावधीनंतर रीडिंग घेत असत, तर स्मार्ट मीटरमध्ये वीज वापराचा डेटा डीजीटल पद्धतीने मिळवता येतो. केंद्राच्या नियमांनुसार स्मार्ट मीटरचे रीडिंग दिवसातून किमान 1 वेळा डीजीटली घेण्याची तरतूद आहे आणि ग्राहकांना वापराचा डेटा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

पारंपारिक मीटरमध्ये काय होते?

नॉर्मल किंवा पारंपारिक मीटरमध्ये मीटरवरील युनिट्स पाहून रीडिंग नोंदवले जायचे. महाराष्ट्रातील आताच्या व्यवस्थेत ऑफीशल मीटर रीडरकडून रीडिंग घेण्याची तरतूद आहे. काही परिस्थितीत रीडिंग घेता आले नाही तर सरासरी वापरावर बिल येऊ शकते. महावितरण ग्राहकांना महावितरण अॅप किंवा पोर्टलद्वारे Self Reading देण्याची सुविधाही उपलब्ध करून देते.

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

स्मार्ट मीटरचा मुख्य फायदा काय?

स्मार्ट मीटरमध्ये रीडिंगसाठी प्रत्येक वेळी व्यक्तीने प्रत्यक्ष घरी येण्याची गरज कमी होते, कारण मीटरचा डेटा दूरस्थपणे मिळू शकतो. कस्टमरला वापराचा डेटा डिजिटल माध्यमातून पाहण्याची सुविधा मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष रीडिंग, अंदाजे बिल आणि वापरातील बदल समजून घेणे तुलनेने सोपे होऊ शकते.

स्मार्ट मीटरमुळे बिल जास्त येते का?

फक्त स्मार्ट मीटर बसवल्यामुळे प्रति युनिट वीजदर आपोआप वाढत नाही. बिलामध्ये लागू असलेला टॅरिफ, प्रत्यक्ष वापर, स्थिर शुल्क आणि इतर लागू घटक महत्त्वाचे असतात. पण स्मार्ट मीटरमुळे वापराचे रीडिंग जास्त अचूक किंवा नियमित मिळाल्याने आधी अंदाजे बिल येत असेल तर प्रत्यक्ष वापरानुसार बिलात फरक दिसू शकतो. त्यामुळे बिल वाढले म्हणजे मीटरने चुकीचे रीडिंग घेतले असे लगेच मानता येत नाही.

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

सरकारचे नियम काय सांगतात?

2023 च्या केंद्र सरकारच्या नियमांनुसार स्मार्ट मीटरचे रीडिंग किमान दिवसातून 1 वेळा दूरस्थपणे घेण्याची तरतूद आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याआधीच्या कालावधीतील Maximum Demand वर आधारित दंड लावता येत नाही. तसेच स्मार्ट मीटरने नोंदवलेली Maximum Demand मंजूर लोडपेक्षा जास्त असल्यास संबंधित बिलिंग सायकलमध्ये प्रत्यक्ष नोंदवलेल्या मागणीच्या आधारे गणना करण्याची तरतूद आहे.

ग्राहकांनी काय तपासावे?

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अॅप किंवा उपलब्ध डिजिटल माध्यमातून वापर तपासत राहणे उपयोगी ठरते. बिल अपेक्षेपेक्षा जास्त वाटल्यास युनिट्स, मीटर रीडिंग आणि बिलातील इतर शुल्क तपासा. तक्रार असल्यास महावितरणकडे चौकशी करता येते.

Web Title: Smart meter vs normal meter electricity bill rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • electricity
  • LIFESTYLE
  • technology

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
4

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.