
Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
चित्रपट पाहताना जर तुम्हाला स्मार्ट टिव्हीवरील चित्र गरजेपेक्षा जास्त स्मूद आणि व्हिडीओसारख्या दिसत असतील, तर याचे कारण मोशन स्मूथिंग असू शकते. हे फीचर टिव्हीमध्ये एक जास्तीची फ्रेम जोडून हालचाली अधिक प्रवाही बनवू शकते. स्पोर्ट्स आणि गेमिंगमध्ये हे फीचर फायद्याचे ठरते, मात्र चित्रपटात सोप ऑपेरा इफेक्ट दिसू शकतो. यासाठी चित्रपट आणि वेब सिरीजसाठी बंद केल्यास तुमचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. वेगवेगळे ब्रँड्स हे फीचर वेगवेगळ्या नावाने सादर करते. जसे की एलजीमध्ये ट्रूमोशन आणि सॅमसंगमध्ये ऑटो मोशन प्लस. जर तुम्हाला फिल्ममेकर मोड सापडला, तर तुम्ही तो देखील वापरून पाहू शकता.
केवळ चांगली स्क्रीन पुरेसी नाही तर आवाज देखील तितकाच गरजेचा आहे. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार, बेस आणि ट्रेबल ॲडजस्ट करू शकता. जर तुम्ही साऊंडबार किंवा होम थिएटरचा वापर करत असाल तर ARC किंवा eARC तपासा. यामुळे टिव्हीचाा ऑडिओ बाहेरील साउंड सिस्टीमवर कार्यक्षमतेने प्रसारित केला जाऊ शकतो.
नवीन टिव्हीचा सॉफ्टवेअर काही महिने जुना असू शकतो. यासाठी सेटअपनंतर सॉफ्टवेअर अपडेट तपासा. अपडेट केल्यानंतर बग्स ठीक करण्यासोबत सिस्टिमची स्थिरता, ॲपचा परफॉर्मंस व सुरक्षा सुधारते. जर ऑटो-अपडेट उपलब्ध असेल, तर ते चालू ठेवणे चांगले.
पावर सेव्हिंग मोड वीज वाचवण्यासाठी फायद्याचे ठरू शकते. यामुळे स्क्रीनची ब्राइटनेस कमी होऊ शकते. विशेषत: एचडीआर कंटेंटमध्ये चित्र थोडे फिकट वाटू शकते. जर तुमचा फोकस चांगल्या पिक्चर क्वालिटीवर असेल तर तर हा पर्याय बंद करून पिक्चर मोडमध्ये स्टँडर्ड, फिल्ममेकर किंवा उपलब्ध कॅलिब्रेटेड पर्याय वापरून पाहू शकता.
OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
प्लेस्टेशन किंवा एक्सबॉक्सवरून गेमिंग करत असाल तर गेम मोडचा वापर करा. ही अनावश्यक इमेज प्रोसेसिंग कमी करून इनपुट लॅग कमी होण्यास मदत होते.