Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, ‘हे’ असू शकतात खास फीचर्स

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या सॅमसंग ईव्हेंटमध्ये कंपनीने सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली होती. आता या स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म झाली आहे. चला तर मग या आगामी स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 02, 2025 | 10:23 AM
लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, 'हे' असू शकतात खास फीचर्स

लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, 'हे' असू शकतात खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Samsung ने जानेवारीमध्ये Samsung Galaxy Unpacked 2025 चे आयोजन केले होते. कंपनीने या ईव्हेंटमध्ये काही गॅझेट्स आणि स्मार्टफोन लाँच केले होते. तर कंपनीने दोन आगामी स्मार्टफोनची घोषणा देखील केली होती. Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन आणि ट्रीपल फोल्ड लवकरच लाँच केला जाणार असल्याची घोषणा कंपनीने या ईव्हेंटमध्ये केली होती.

कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग

Samsung च्या ट्रीपल फोल्ड स्मार्टफोनबाबत चर्चा सुरु असतानाच आता सर्वात पातळ फोनची लाँच डेट समोर आली आहे. Samsung च्या सर्वात पातळ स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण हा स्मार्टफोन आता लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. अलिकडच्या अहवालानुसार, कंपनी एप्रिलमध्ये हा सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करू शकते. याबद्दल बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात होती आणि कंपनीने जानेवारीमध्ये Galaxy S25 मालिकेच्या लाँचिंग दरम्यान या फोनची झलक दाखवली होती. त्यामुळे प्रत्येकाला या आगामी स्मार्टफोनबाबत प्रचंड उत्सुकता होती. (फोटो सौजन्य – Pinterest)

आता लवकरच या नव्या स्मार्टफोनचं अनावरण होणार आहे. लाँच डेट सोबतच स्मार्टफोनची काही अपेक्षित फीचर्स देखील समोर आली आहेत. कंपनीने ईव्हेंटमध्ये स्मार्टफोनची एक झलक सादर केली होती, त्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की स्मार्टफोनचं डिझाईन काहीस हटके असणार आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, आगामी स्मार्टफोनच्या मागील पॅनेलवर दोन कॅमेरे आहेत.

या दिवशी लाँच होऊ शकतो सॅमसंगता पातळ स्मार्टफोन

16 एप्रिल रोजी एक ईव्हेंट आयोजित केला जाईल, ज्यामध्ये हा फोन लाँच केला जाईल, असे सांगितले जात आहे, परंतु ग्राहकांना तो खरेदी करण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते आणि त्याची विक्री मेपासून सुरू होईल. तथापि, कंपनीकडून अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नााही नाही. सुरुवातीला कंपनी या स्मार्टफोनचे फक्त 40,000 युनिट्स तयार करेल. असा अंदाज लावला जात आहे की तो काळ्या, हलक्या निळ्या आणि चांदीच्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

बेरोजगार तरूण आणि गृहिणींना टार्गेट करतोय Pig butchering स्कॅम! तुमच्या सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा या टीप्स

Samsung Galaxy S25 Edge चे अपेक्षित फीचर्स

डमी युनिटवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की Samsung Galaxy S25 Edge ची रचना गॅलेक्सी S25 डिव्हाईससारखीच असेल, परंतु त्याची जाडी खूपच कमी असेल. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्याची जाडी 5.84 मिमी असू शकते, जी Galaxy S25 पेक्षा खूपच कमी आहे. Galaxy S25 Edge पातळ असूनही, कंपनी कामगिरीशी तडजोड करणार नाही. लीक्सनुसार, यात अल्ट्रा-थिन बेझलसह 6.7 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले, क्वालकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 200 एमपी मुख्य कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो लेन्स आणि 12GB RAM असू शकते. कंपनी यात 3,900mAh बॅटरी देऊ शकते. आतापर्यंत त्याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाइनअपमध्ये त्याच्या स्थानानुसार, त्याची किंमत 60,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Web Title: Smartphone galaxy s25 edge launch date confirmed know about expected specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.