कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन आणि अपग्रेड फीचर्स घेऊन येत असतो. या फीचर्समुळे युजर्सना WhatsApp वापरण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. WhatsApp मध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षितता टिकून राहते. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका WhatsApp सेटिंगबद्दल सांगणार आहोत. ही सेटिंग तुम्हाला ऑफीसमध्ये बऱ्याच प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.
तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेलात आणि याबद्दल तुम्हाला कोणालाही न सांगता तुमच्या WhatsApp ला शेअर करायचा असेल तर यासाठी एक सोपी ट्रीक आहे. तुम्ही WhatsApp मध्ये एक छोटी सेटिंग करू शकता, ज्यामुळे तुमचे WhatsApp स्टेटस तुम्हाला ज्या व्यक्तिंसोबत शेअर करायचे आहेत, ते फक्त त्यांनाच दिसतील. WhatsApp वर एक फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस फक्त त्यांनाच दाखवू शकाल ज्यांना तुम्ही ते दाखवू इच्छिता. याचा अर्थ असा की ज्यांना तुम्ही तुमचे WhatsApp स्टेटस दाखवू इच्छित नाही त्यांना तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून वगळू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी ट्रीक फॉलो करून तुमच्या WhatsApp सेटिंगमध्ये थोडे बदल करण्याची गरज आहे. चला तर मग या सेटिंदबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp ने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि 84 लाख भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. WhatsApp ची मूळ कंपनी मेटाने कारवाई केली आहे. WhatsApp च्या गैरवापर आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे कंपनीने 84 लाख अकाउंट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे युजर्सची होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल.
मेटाच्या पारदर्शकता अहवालानुसार, WhatsApp ने भारतात 8.45 दशलक्ष (84 लाखांहून अधिक) अकाउंट्सवर बंदी घातली आहे. Information Technology Act 4(1)(d) आणि कलम 3A(7) च्या तरतुदींचे पालन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अहवालात म्हटले आहे की ही बंदी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान लागू करण्यात आली. अहवालानुसार, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 1.66 दशलक्ष खाती तात्काळ ब्लॉक करण्यात आली. उर्वरित WhatsApp अकाउंट्सची प्रथम चौकशी करण्यात आली आणि संशयास्पद क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.






