
I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
iPhone 16 Flipkart Offer: तुम्ही पण नवीन iPhone घेण्याचा विचार करताय का? मग तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. Apple चा सगळ्यात जास्त विकला जाणारा फोन iPhone 16 आता खूपच स्वस्तात मिळत आहे. Flipkart वर या फोनवर मोठी सूट मिळत आहे.Apple लवकरच आपले नवीन iPhone 17 लॉन्च करणार आहे, त्याआधीच जुन्या मॉडेलच्या किमती पडल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.
iPhone 16 जेव्हा भारतात लॉन्च झाला होता तेव्हा त्याची किंमत 79,900 रुपये होती. पण आता Flipkart वर तो थेट 15,000 रुपयांच्या सूटसह 64,900 रुपयांना मिळत आहे.पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. यावर अजून सूट मिळवता येईल. जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank किंवा SBI चं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला त्यावर अजून 5,145 रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजे सगळे डिस्काउंट पकडले तर हाच फोन तुम्हाला फक्त 59,755 रुपयांना पडेल. 80 हजारचा फोन 60 हजाराच्या आत, ही डील वाईट नाही आहे. I Phone 16 Price Drop:
एवढे पैसे एकदम द्यायचे नाहीत? काही टेन्शन नाही. Flipkart वर No-Cost EMI चा पण ऑप्शन आहे. तुम्ही महिन्याला फक्त 2,262 रुपये भरून हा फोन घेऊ शकता. EMI 36 महिन्यांपर्यंत वाढवता येते.
तुमच्याकडे जुना फोन असेल तर तर मग आणखी फायदा होईल. Flipkart वर एक्सचेंज ऑफर पण चालू आहे. जुना फोन दिला तर 49,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे.पण हे लक्षात ठेवा, एक्सचेंजची किंमत तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर ठरते. तो कोणता ब्रँड आहे, किती स्टोरेज आहे, त्याला काही तुटफुट आहे का यावर सगळं अवलंबून असतं.उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडे iPhone 12 Pro असेल आणि त्याची कंडिशन चांगली असेल तर तुम्हाला त्यावर 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. म्हणजे मग iPhone 16 तुम्हाला 40 हजाराच्या आसपास पडेल.