Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

स्मार्टफोनच्या दुनियेत AI तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. चीनच्या स्टेपफन कंपनीने स्टेपएक्स निओ हा AI-केंद्रित स्मार्टफोन सादर करत पारंपरिक अँड्रॉईड आणि आयफोन मॉडेल्सना नवे आव्हान दिल्याचा दावा केला आहे. हा फोन अनेक कामे एआय एजंटच्या मदतीने स्वयंचलितपणे पूर्ण करू शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 02:32 PM
जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत स्वत: करणार सर्व कामं

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत स्वत: करणार सर्व कामं

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या स्टेपफन कंपनीने स्टेपएक्स निओ हा जगातील पहिला मास-मार्केट एआय एजेंटिक स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे.
  • हा स्मार्टफोन स्टेप एओएसवर चालतो आणि फ्लाइट, हॉटेल बुकिंगसारखी अनेक कामे एआय एजंटद्वारे करू शकतो.
  • कंपनीच्या दाव्यानुसार, फोन ऑफलाइन एआय क्षमता आणि 32 भाषांमधील लाईव्ह ट्रान्सलेशनला सपोर्ट करतो.
सहसा आपण अँड्रॉईड किंवा आयओएस सारख्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे स्मार्टफोन वापरतो. पण तुम्ही कधी अशा स्मार्टफोनचा विचार केला आहे का, जो अँड्रॉईड किंवा आयओएसवर नाही तर एआयवर आधारित असेल. असा स्मार्टफोन जो फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत तुमची सर्व काम स्वत:च करेल. असा स्मार्टफोन जो इंटरनेटशिवाय देखील चालू शकतो. एका चिनी कंपनीने असाच एक स्मार्टफोन डिझाईन केल्याचा दावा केला आहे. चीनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनी स्टेपफनने स्टेपएक्स निओ हा जगातील पहिला मास-मार्केट एजेंटिक स्मार्टफोन सादर केला.

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

पहिला AI एजेंटिक फोन

अलीकडेच अशी चर्चा सुरु झाली होती की, ओपनएआय एका स्मार्टफोनवर काम करत आहे आणि कंपनी लवकरच या स्मार्टफोनची अधिकृतपणे घोषणा करू शकते. यादरम्यान स्टेपफनने पहिला AI एजेंटिक फोन बनवण्याचा दावा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, मायक्रोसॉफ्टच्या माजी अधिकाऱ्यांनी 2003 मध्ये ही कंपनी लाँच केली होती.  (फोटो सौजन्य: X)

स्मार्टफोनच्या नावाबाबत गोंधळ

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अशी माहिती मिळत आहे की, स्टेपफन कंपनी बऱ्याच काळापासून ओप्पो आणि Geely सारख्या मोठ्या कंपन्यांना एआय सर्विस ऑफर करत आहे. मात्र या स्मार्टफोनच्या नावाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण बाजारात StepX नावाचे प्लॅटफॉर्म आधीपासूनच उपलब्ध आहे. याशिवाय एलन मस्कची कंपनी SpaceX चे नाव देखील या स्मार्टफोनच्या नावाशी मिळते-जुळते आहे.

डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करण्यासाठी सक्षम

कंपनीने लाँच केलेला हा फोन नवीन स्टेप एओएसवर चालतो. या फोनमध्ये स्टेप अमू नावाचे एक पर्सनल इंटेलिजेंट एआय एजेंट दिले आहे. या एआयच्या मदतीने सामान्य भाषेत संभाषण केले जाऊ शकते. या कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) एआय एजंटसाठी एक अद्वितीय वातावरण तयार करते, ज्यामुळे मेमोरी, निर्णय घेण्याची क्षमता आणि कार्यप्रदर्शनातील समस्यांचे निराकरण होते. रिपोर्ट्सनुसार, याची मेमोरी रिकॉल स्पीड केवळ 15 मिलीसेकंद आहे. तसेच हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय देखील काम करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितलं जात आहे.

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

डिव्हाईसमध्ये नथिंग फोनप्रमाणे एक डॉट मॅट्रिक्स एलईडी डिस्प्ले

या फोनमध्ये एआय केवळ ऑन डिव्हाईसच काम करत नाही तर कठिण कामांसाठी इंटरनेटची मदत देखील घेऊ शकते. विशेष म्हणजे यासाठी यूजरचा पर्सनल डेटा फोनच्या बाहेर पाठवला जात नाही. तथापि, कंपनी या बेंचमार्कची किंवा प्रतिस्पर्धी मॉडेल्सची नावे उघड करत नाही. कंपनीने हे डिव्हाईस अँड्रॉईड, लिनक्स आणि आरटीओएसचे मिश्रण असल्याचे सांगितलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडीओवरून समजते की, या डिव्हाईसमध्ये देखील नथिंग फोनप्रमाणे एक डॉट मॅट्रिक्स एलईडी डिस्प्ले आहे. या फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स अद्याप जाहिर करण्यात आले नाहीत. मात्र कंपनीने Alipay, Baidu आणि Didi सारख्या चीनी ॲप्ससोबत भागीदारीची घोषणा निश्चितपणे केली आहे.

Web Title: Stepfun launched world first agentic ai smartphone stepx neo with step aos tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क
1

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!
4

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.