Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
कंपनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही असामान्य ॲक्टिव्हिटी आढळल्या आहेत. तुमच्यापैकी अनेक लोकांना आमच्या अकाऊंटवरून गेल्या 24 तासांत काही अनपेक्षित मेसेज देखील आले असतील. आमची टीम या समस्येचा तपास करत आहे आणि ती सोडवण्यासाठी काम करत आहे. संयम बाळगण्यासाठी धन्यवाद. (फोटो सौजन्य: Pinterest)
पोस्ट शेअर करत कंपनीने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की, नमस्कार फॉलोअर्स, आमच्या लक्षात आले आहे की अलीकडेच तुमच्यापैकी काहींना आमच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही असामान्य आणि संदर्भहीन असे ‘डायरेक्ट मेसेजेस’ (DMs) आले आहेत; याबद्दल आम्ही तुम्हाला स्पष्टपणे माहिती देऊ इच्छितो. आमच्या टीमने या मेसेजेसची तपासणी केली असून, त्यात कोणताही हानिकारक उद्देश किंवा घातक लिंक्स असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे कृपया काळजी करू नका. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही या प्रकरणाच्या मूळ कारणाचा शोध घेत आहोत आणि हा प्रकार लवकरात लवकर पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुमचा विश्वास आणि सुरक्षितता ही आमच्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. या गोष्टीकडे आमचे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. – टिम अजिओ
कंपनीने शेअर केलेल्या या पोस्टनंतर आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच यूजर्सच्या सुरक्षेवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या अकाऊंटवरून पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये कोणत्याही हानिकारक लिंक्स आढळल्या नाहीत.
तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेऊ नका.
इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करू शकता. यामुळे तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेत आणखी एक स्तर जोडला जातो. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन फोन किंवा कंप्यूटरने तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मोबाईलवर एक कोड येतो. हा कोड एंटर केल्याशिवाय तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट दुसऱ्या डिव्हाईसवर चालू होत नाही. सेटिंगमध्ये जाऊन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करू शकता. तसेच तुमचे अकाऊंट कधी आणि कुठे लॉगिन झाले आहे, याची माहिती देखील तुम्हाला इंस्टाग्राम सेटिंगमधून मिळू शकते.
अकाऊंटसाठी नेहमी असा पासवर्ड सेट करा जो अगदी सहज ट्रॅक केला जाऊ शकत नाही. यामध्ये अक्षर, संख्या आणि स्पेशल सिम्बल्सचा वापर करा. पासवर्ड वेळोवेळी बदला आणि कोणासोबत शेअर करू नका.
वेळोवेळी तुमची सुरक्षा सेटिंग तपासत राहा. तुमचा ईमेल आणि फोन नंबर योग्य अकाऊंटसोबत जोडला असल्याची खात्री करा. कोणत्याही संशयास्पद हालचाली नजर आल्यास तात्काळ अकाऊंटचा पासवर्ड बदला. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.






