Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

जे लोकं संपूर्ण दिवस नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर करतात, त्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खरं तर, नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्सचे जसे फायदे आहेत, त्याचप्रमाणे ते जास्त काळ वापरण्याचे अनेक तोटे आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2025 | 09:02 AM
स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजीटल जगात नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच लोक हेडफोन घालून घराबाहेर पडतात आणि त्यांचा संपूर्ण दिवस वापर करतात. नॉइस कँसलिंग हेडफोनचे अनेक फायदे आहेत. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांसाठी नॉइस कँसलिंग हेडफोन प्रचंड फायद्याचे ठरतात. कारण नॉइस कँसलिंग हेडफोनमुळे आपल्याला बाहेरील आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे आपण आपलं काम शांतपणे आणि लक्ष देऊन करू शकतो.

Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत

नॉइस कँसलिंग हेडफोनमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देखील मदत होते. कारण गोंधळ असलेल्या ठिकाणी विद्यार्थी शांतपणे, लक्ष देऊन अभ्यास करू शकत नाहीत. अशावेळी नॉइस कँसलिंग हेडफोन त्यांची मदत करतात. तसेच ऑफीसच्या कामांसाठी देखील नॉइस कँसलिंग हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच सर्व कारणांमुळे अनेक लोकं दिवसभर नॉइस कँसलिंग हेडफोन लावून ठेवतात. तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स जास्त काळ वापरण्याचे अनेक तोटे आहेत. यामुळे तुम्हाला कानदुखी आणि इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर आपल्यासाठी कशा प्रकारे धोकादायक ठरू शकतो, याबद्दल जाणून घेऊया.

नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे आजूबाजूचा आवाज कमी होतो. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे आजूबाजूचा नको असलेला आवाज कमी होतो. हे अ‍ॅक्टिव नॉइस कंट्रोलद्वारे केले जाते. यामुळे आवाज जास्त न वाढवता सहजपणे ऑडिओ कंटेंट ऐकता येतो, परंतु नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा दीर्घकालीन वापर अनेक तोटे घेऊन येतो. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा सततचा वापर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

सभोवतालच्या परिस्थितीचे भान राहत नाही – नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे तुम्हाला आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. त्यामुळे वाहतूक किंवा इतर ठिकाणी धोका वाढतो. सहसा प्रवास करताना, गाडी चालवताना नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा वापर करणं टाळा.

ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम – सतत हेडफोन लावल्याने कानात अस्वस्थता येते. याशिवाय, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. जर हेडफोनवर जास्त वेळ जास्त आवाजात काहीतरी ऐकले तर ते एखाद्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. यासोबतच कानात संसर्ग होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे हेडफोन्सचा वापर करताना नेहमी 60:60 चा नियम फॉलो करावा.

डोकेदुखी किंवा चक्कर येणे – चालताना नॉइज कॅन्सलिंग हेडफोन वापरल्याने अनेकांना डोकेदुखी किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या येऊ शकतात. याशिवाय, दीर्घकाळ वापरल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे हेडफोन्सचा वापर मर्यादित ठेवा.

iPhone पासून Vivo V50 पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स! वाचा संपूर्ण यादी

सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

कधीकधी मनोरंजन किंवा ध्यानासाठी हेडफोन वापरणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत, आवाजाची पातळी सामान्य राहील याची खात्री करा. डिव्हाइसच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आवाजात जास्त वेळ गाणी किंवा इतर गोष्टी ऐकू नका. जास्त वेळ हेडफोन वापरू नका आणि मध्येमध्ये ब्रेक घेत राहा. किमान 60 मिनिटांचा हेडफोनचा वापर करणं उत्तम आहे, पण त्यापेक्षा अधिक हेडफोनचा वापर करत असाल तर सावध राहा, यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Stylish and cool noise canceling headphones are dangerous for ears know how to stay safe tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Headphones Side Effects
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
1

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
2

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
3

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
4

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.