Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत
आयफोन, ब्रँडेड स्मार्टफोन्स यासोबतच आता फोल्डिंग फोनची क्रेझ देखील प्रचंड वाढली आहे. त्यांचा स्टायलिश लूक आणि कूल डिझाईन आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास देते. फोल्डिंग फोनचा लूक खूपच स्टायलिश असतो आणि ते वापरण्यासाठी देखील अतिशय सोपे असतात. यामुळे सध्या लोकं फोल्डिंग फोनची खरेदी करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देतात. स्मार्टफोनची युजर्सची हीच मागणी लक्षात घेऊन आता अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे फोल्डिंग स्मार्टफोन लाँच केले आहेत. पण स्मार्टफोनची किंमत प्रचंड असते.
हा फोन खरेदी करावा असा विचार तर अनेकांचा असतो पण त्याच्या प्रचंड किंमतीमुळे अनेकजण असे फोन खरेदी करणं टाळतात. तुम्ही देखील फोल्डिंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Samsung Galaxy Z Flip 6 तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर या फोनची किंमत लाखोंच्या घरात आहे, पण Amazon वर तुम्हाला हा फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही Amazon वरून परवडणाऱ्या किमतीत Samsung Galaxy Z Flip 6 खरेदी करू शकता. Samsung Galaxy Z Flip 6 हा स्मार्टफोन 1,09,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. पण आता हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन कोणत्याही बँके सवलतीशिवाय 19% च्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर, या फोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे, जी त्याच्या मूळ किमतीपेक्षा 21,000 रुपये कमी आहे.
या फोनवर चांगली एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून, तुम्ही या डिव्हाइसवर 22,800 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. तथापि, एक्सचेंज व्हॅल्यूची किंमत एक्सचेंज केल्या जाणाऱ्या फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. तुम्हाला फोनची माहिती देऊन एक्सचेंज व्हॅल्यू तपासावी लागेल. फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळेल.
Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X मेन स्क्रीन आहे ज्याचे रिझोल्यूशन FHD+ आहे आणि ते 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. याशिवाय, या हँडसेटमध्ये 60Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 3.4 -इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले आहे.
Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम
Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, या फोल्डेबल हँडसेटमध्ये 50 एमपीचा मुख्य कॅमेरा आणि 12 एमपीचा अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनच्या फ्रंटला 10 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 4000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.