Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी सतत खराब होतेय? तुमच्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

तुम्ही स्मार्टफोनची बॅटरी सतत 100 टक्के चार्ज करत असाल तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. स्वस्त चार्जर वापरून तुमचा स्मार्टफोन चार्ज करत असाल तर त्यामुळे देखील तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच खराब होऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2024 | 11:00 AM
Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी सतत खराब होतेय? तुमच्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

Smartphone Tips: स्मार्टफोनची बॅटरी सतत खराब होतेय? तुमच्या या सवयी ठरू शकतात कारणीभूत

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय आपली अनेक कामं अपूर्ण असतात. त्यासाठी आपल्या स्मार्टफोनची व्यवस्थित काळजी घेणं, फार महत्त्वाचं आहे. स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी. तुमचा स्मार्टफोन तुम्हाला वर्षानुवर्षे नव्या सारखा ठेवायचा असेल, तर तुम्हाला स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खराब झाली तर तुमचा स्मार्टफोन काहीही फायद्याचा नाही. पण स्मार्टफोनच्या बॅटरीची काळजी कशाप्रकारे घ्यावी हे अनेकांना माहीत नसतं.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. या चुका तुम्ही स्मार्टफोन चार्ज करताना टाळल्या पाहिजेत. तुमच्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे फोन आणि बॅटरी या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही या चुका करणं टाळलं पाहिजे. (फोटो सौजन्य – pinterest)

सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवू नका

सॉकेटमध्ये प्लग इन केल्यावर चार्जर वीज वापरत राहतो. तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्जरला कनेक्ट केला नसेल तर सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवू नका. यामुळे तुमचं विज बील वाढतं, तसेच तुमचा चार्जर देखील खराब होऊ शकतो. सॉकेटमध्ये चार्जर चालू ठेवल्याने ट्रान्सफॉर्मर उष्णता सोडतो, ज्यामुळे चार्जर गरम होऊन त्याचा स्फोट देखील होऊ शकतो. सॉकेटमध्ये चार्जर घालून ठेवनं तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकतं.

बॅटरी 100 टक्के चार्ज करू नका

जर तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी प्रत्येक वेळी 100 टक्के चार्ज करत असाल, तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. प्रत्येक बॅटरीला एक विशिष्ट चार्ज सायकल असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही फोन प्रत्येक वेळी 100 टक्के चार्ज केला तर हे चक्र लवकरच संपेल. बॅटरी चार्ज करण्यासाठी एक सामान्य नियम म्हणजे ती महिन्यातून एकदा पूर्णपणे चार्ज करणे आणि उर्वरित वेळेत ती 20% आणि 80% दरम्यान ठेवणे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी सतत 100 टक्के चार्ज करत असाल तर आत्ताच थांबा.

बॅटरी पूर्णपणे संपू देऊ नका

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे संपू देऊ नका. अनेकजण असे असतात जे स्मार्टफोनची बॅटरी 0 टक्के झाल्यानंतर फोन चार्जिंगला लावतात. पण असं केल्याने बॅटरीवर परिणाम होतो आणि स्मार्टफोन लवकरच खराब होऊ शकतो. नवीन लिथियम बॅटरी चार्ज सायकलमध्ये काम करतात. त्यामुळे रोज बॅटरी 0 टक्के झाल्यानंतर फोन चार्ज केल्यास फोनचं आयुष्य कमी होऊ शकतं.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फोन रात्रभर चार्जिंगला ठेवू नका

तुम्ही तुमचा फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवत असाल तर तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होऊ शकतो. कारण स्मार्टफोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवल्यास बॅटरी जास्त चार्ज होईल आणि तुमची वीज वाया जाईल. अशा परिस्थितीत फोन गरम होऊन त्याचा स्फोट देखील होऊ शकतो.

स्वस्त चार्जर वापरणं टाळा

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसोबत एक चार्जर दिला जातो, जो कंपनीचा ओरिजीनल चार्जर असतो. हा चार्जर तुमच्यासाठी स्मार्टफोनसाठी बेस्ट असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन इतर कोणत्याही ब्रँडच्या चार्जरने किंवा स्वस्त चार्जरने चार्ज करणं टाळा.

Web Title: Tech guide your habits can affect on smartphone battery avoid this mistakes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष
1

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?
2

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
3

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू
4

Free Fire MAX मध्ये प्लेअर्सना मिळणार ‘Panther Strikes’ फ्री जिंकण्याची संधी! फेडेड व्हिल इव्हेंट झाला सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.