अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
भारतासह अमेरिका आणि दुसऱ्या देशांमध्ये देखील गूगल पिक्सेल 10 ए ची किंमत वाढवण्यात आली आहे. रॅम आणि स्टोरेजच्या कमतरतेमुळे कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली असल्याचे सांगितलं जात आहे. आता या स्मार्टफोनची नवीन किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
गूगल पिक्सेल 10 ए भारतात फेब्रुवारी महिन्यात 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 6 हजार रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना गूगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 55,999 रुपये मोजावे लागणार आहेत. गूगलच्या इंडिया स्टोअरवर देखील आता गूगल पिक्सेल 10 ए 55,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे.
गूगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. या फोनमध्ये 6.3-इंच (1,080×2,424 पिक्सेल) ॲक्चुआ (pOLED) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा स्मार्टफोन कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह लाँच करण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आहे. गूगलचा हा फोन टेन्सर G4 चिपसेट आणि टायटन M2 सिक्योरिटी को-प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोनमध्ये IP68 रेटिंग दिली आहे.
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
गुगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 48-मेगापिक्सेल (f/1.7) प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्याची फोकल लेंथ 25mm आणि सेंसरचा आकार 1/2.0-इंच आहे. हा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनला सपोर्ट करतो. फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा (f/2.2) अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. याचा फील्ड ऑफ व्यू 120-डिग्री आणि सेंसर साइज 1/3.1-इंच आहे. गूगल पिक्सेल 10 ए स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेल (f/2.2) फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 30W वायर्ड आणि 10W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,100mAh बॅटरी दिली आहे.