
IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत... नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
यावर्षीचे ईव्हेंटची 10वी आवृत्ती आयोजित केली जात आहे. स्केल विथआऊट बाऊंड्रीज म्हणजेच कोणत्याही सिमेशिवाय तंत्रज्ञान मोठ्या स्तरावर घेऊन जाणे, हाच या ईव्हेंटचा मुख्य विषय आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि दूरसंचार विभागाच्या वतीने या ईव्हेंटचे आयोजन केले जाते.
यंदा आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये 6G, आर्टिफीशियल इंटेलिजेंस, 5G, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि सायबर सुरक्षा यासांरख्या तंत्रज्ञानावर सर्वाधिक चार्चा केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्युनिकेशंस, रोबोटिक्स आणि डिजिटल इंफ्रास्ट्रक्चरसंबंधित नवे तंत्रज्ञान देखील या ईव्हेंटमध्ये सादर केले जाणार आहे. येणाऱ्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात कसा बदल केला जाईल, हेच या आयोजनातून दाखवले जाणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये 6G ला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ईव्हेंटमध्ये भारताची 6G तयारी, ग्लोबल स्टँडर्ड्स आणि भविष्यात वापरल्या जाणाऱ्या नव्या कम्युनिकेशन टेक्नोलॉजीवर चर्चा होणार आहे. 6G सोबतच अशा नेटवर्कवर देखील लक्ष दिले जाणार आहे, जे एआयच्या मदतीने स्वत: काम करण्यासाठी आणि नेटवर्कची क्षमता गरजेनुसार बदलण्यासाठी सक्षम असणार आहे. याद्वारे भारत नेक्स्ट जेनरेशनच्या कम्युनिकेशन टेक्नोलॉजीमध्ये आपली भूमिका मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सॅटेलाइट कम्युनिकेशनवर देखील फोकस असणार आहे. विशेषत: ईव्हेंटमध्ये अशा तंत्रज्ञानावर चर्चा केली जाणार आहे, जे पारंपरिक मोबाइल नेटवर्कच्या कक्षेबाहेरील भागांतही संपर्क साधणे शक्य करते. मोबाईल डिव्हाईसला थेट सॅटेलाईटसोबत जोडणारे तंत्रज्ञान भविष्यात दुर्गम भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.
मोबाईल नेटवर्क आणि डिजिटल सेवांचा विस्तार होत आहे. मात्र यासोबतच सायबर सुरक्षेमधील आव्हान देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये डिजिटल सुरक्षा, पर्सनल डेटा सुरक्षा, ऑनलाइन फ्रॉड आणि स्पॅम रोखणं, यासांरख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये नवीन कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी खास कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार आहेत.