
boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
AI च्या युगातील मानसिक आरोग्य! बंगळुरुमधील MindTech Summit 2026 मध्ये तज्ज्ञ एकवटले, भविष्यावर चर्चा
boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले की, “आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही ‘boAt 2.0’ साठी सज्ज होत आहोत.” त्यांनी पुढे नमूद केले की, “आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस्थान अधिक बळकट करू. सोबतच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि प्रोजेक्टर्स, ग्रूमिंग व चार्जिंग सोल्यूशन्स यांसारख्या नवीन कन्झ्युमर तंत्रज्ञान श्रेणींमधील वाढीवर आमचा विशेष भर असणार आहे. boAt ला भारतातील एक दीर्घकाळ टिकणारी मोठी तंत्रज्ञान कंपनी बनवणे हे आमचे ध्येय आहे.” (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपला ताळेबंद आणि नफा क्षमता अधिक मजबूत केली आहे. अशातच आता boAt चा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करांनंतरचा boAt चा नफा ३८ टक्क्यांनी वाढून तब्बल ८४.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी आता पूर्णपणे बँक कर्जमुक्त झाली आहे आणि आता कंपनीकडे सुमारे ३९७ कोटी रुपयांची रोकड राखीव उपलब्ध असल्याचे सांगितलं जात आहे. गौरव नायर यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आमचे संपूर्ण लक्ष बाह्य आव्हानांचा सामना करण्यात आणि boAt च्या पायाभरणीला अधिक बळकट करणे यावर होते.
boAt साठी नवीन क्षेत्रांचे योगदानही वाढू लागले आहे. चार्जिंग सोल्यूशन्स, केबल्स आणि गेमिंगसह कंपनीच्या इतर व्यवसायांचा विभागीय नफा आर्थिक वर्ष २६ मध्ये सुमारे १४ कोटी रुपयांवरून वाढून ४६ कोटी रुपये झाला आहे. वेअरेबल्स व्यवसायानेही चांगला टर्नअराउंड दाखवला आहे.
एका वर्षापूर्वी या विभागाला सुमारे ५४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर २०२६ या आर्थिक वर्षात या विभागाने सुमारे ७ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. नायर यांनी सांगितले की, “ऑडिओ क्षेत्रात आमचे नेतृत्व अधिकच बळकट होत आहे. ‘वेअरेबल्स’चा व्यवसाय फायदेशीर ठरला आहे आणि नवीन श्रेणींमुळेही चांगल्या महसुलाच्या व नफ्याच्या संधी निर्माण होत आहेत.”
भारताबाहेरही boAt आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय महसूल सुमारे २० कोटी रुपयांवरून वाढून ४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकूण व्यवसायात याचा वाटा सध्या लहान असला, तरी कंपनी याकडे भविष्यातील वाढीची उत्तम संधी म्हणून पाहत आहे. ऑडिओ क्षेत्रात निर्माण झालेली ब्रँडची ओळख, वितरणाचे जाळे आणि ग्राहकांच्या पसंतीची समज यांचा वापर आता इतर तंत्रज्ञान श्रेणींमध्ये करण्याची boAt ची रणनीती आहे.