Nothing phone 3 स्मार्टफोनचं लाँच कन्फर्म, मॉडेल नंबरसह स्पेसिफिकेशन्स लिक
स्मार्टफोन कंपनी नथिंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. नवीन स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर स्पॉट झाला आहे. Nothing phone 3 हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. कंपनी Nothing phone 2 चा उत्तराधिकारी म्हणून Nothing phone 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. या वर्षी जुलैमध्ये Nothing phone 2 लाँच करण्यात आला होता.
या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला. या यशस्वी लाँचिंगनंतर आता कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. हा फोन कधी लाँच होणार याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. पण Nothing phone 3 अनेक अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह लाँच केला जाऊ शकतो.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यापूर्वी, फोनला अनेक तपशीलांसह IMEI डेटाबेसवर देखील सूचीबद्ध केले गेले आहे. जे सूचित करते की त्याचे भारत लाँच कन्फर्म झाले आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार आहे. प्रोसेसर, रॅम आणि ऑपरेटिंग सिस्टीम यांसारखी अनेक माहिती गीकबेंचवर स्पॉट झाली आहे. (फोटो सौजन्य – X)
मॉडेल क्रमांक A059 सह आगामी Nothing Phone 3 गीकबेंचवर दिसला आहे. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 SoC मिळू शकतो. या प्रोसेसरने सिंगल-कोर चाचणीमध्ये 1149 गुण प्राप्त केले आहेत, तर मल्टी-कोर चाचणीमध्ये 1813 गुण प्राप्त केले आहेत.
लिस्टिंगमध्ये सांगितलं आहे की आगामी स्मार्टफोन Adreno 810 GPU सह सुसज्ज असेल आणि प्रोसेसर 8 GB रॅमसह लाँच केला जाईल. यामध्ये आणखी काही व्हेरिएंट असतील. Nothing Phone 3 Android 15 आधारित NothingOS स्किनवर चालेल.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नथिंगच्या आगामी सिरीजमध्ये दोन मॉडेल्स लाँच केले जाऊ शकतात. मॉडेल क्रमांक A059 आणि A059P असलेले दोन फोन वर्षाच्या सुरुवातीला स्पॉट झाले होते. ज्यामध्ये P चा अर्थ प्लस मॉडेल असू शकतो. रिपोर्टनुसार, Nothing Phone 3 चे सांकेतिक नाव Arcanine आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असू शकतो. प्लस मॉडेलचे सांकेतिक नाव Hisuian आहे. ज्यामध्ये MediaTek Dimension 9400 प्रोसेसर असू शकतो. प्लस मॉडेलमध्ये 6.7 इंचाची स्क्रीन मिळू शकते.
Nothing Phone 3 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 599 डॉलर म्हणजेच अंदाजे 50,000 रुपये असू शकते. प्रो मॉडेल 699 डॉलर म्हणजेच 59,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.
प्रोसेसर: Nothing Phone 2 स्नॅपड्रॅगन 8 जनरल 1 प्रोसेसरवर आधारित आहे.
डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे.
मागील कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये 50MP + 50MP मागील कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 4700 mAh बॅटरी देण्यात आली आहे.