Tech Tips: असली - नकली चार्जरमध्ये गोंधळलात? सरकारचं हे अॅप तुम्हाला करेल मदत, वाचा संपूर्ण प्रोसेस
आपण स्मार्टफोन खरेदी करतो, तेव्हा काही स्मार्टफोन्स सोबत आपल्याला चार्जर दिला जातो. तर काही स्मार्टफोन्सचा चार्जर आपल्याला खरेदी करावा लागतो. चार्जर खरेदी करताना तो चार्जर असली आहे की नकली यामध्ये अनेकवेळा आपला गोंधळ उडतो. नकली चार्जरमुळे आपल्या स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. तसेच नकली चार्जरमुळे ब्लास्ट झाल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
असली आणि नकली चार्जर ओळखावा कसा, यासाठी अनेकजण गोंधळलेलं आहेत. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारच्या अॅपच्या मदतीने केवळ एका क्लिकवर असली आणि नकली चार्जर ओळखू शकता. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. बाजारात खऱ्या चार्जरप्रमाणे दिसणारे अनेक चार्जर उपलब्ध आहेत. पण यातून तुम्हाला खरा चार्जर ओळखायचा आहे, जो तुमच्या स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम ठरू शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)
आपला चार्जर खराब झाला किंवा बिघडला तर आपण बाजारातून दुसरा विकत घेतो. पण आपण विकत घेतलेला चार्जर कंपनीच्या ओरिजीनिल ब्रँडचा आहे की नकली आहे, हेच आपल्याला माहीत नसत. कंपनीच्या ब्रँडच्या नावाखाली अनेक लोकं नकली चार्जर विकत असतात. पण या बनावट चार्जरमुळे आपला स्मार्टफोन तर खराब होतोच शिवाय चार्जरचा स्फोट होण्याची देखील शक्यता असते. ज्यामुळे आपल्या जिवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आता या सर्व घटना टाळण्यासाठी आणि ग्राहकांना असली आणि नकली चार्जरमधील फरक कळावा, यासाठी सरकारने एक अॅप लाँच केलं आहे. बीआयएस केअर असं या अॅपचं नाव आहे. हे अॅप तुम्हाला बनावट चार्जर ओळखण्यासाठी मदत करणार आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हे बीआयएस केअर ॲपचे मालक आहेत. बीआयएस केअर ॲप भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. बीआयएस ही भारतात विकल्या जाणाऱ्या मालाची गुणवत्ता प्रमाणीकरण संस्था आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही नवीन चार्जर खरेदी करता तेव्हा त्यावर प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर आणि QR कोड दोन्ही रेकॉर्ड केले जातात. पण तुम्ही खरेदी करत असलेल्या चार्जरवर प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर आणि QR कोड नसेल तर तो चार्जर नकली असल्याचे समजते. प्रोडक्ट रजिस्ट्रेशन नंबर XXXXXXX फॉरमॅटमध्ये सुरू होते.