लवकरच लाँच होणार Nothing Phone 3! मिळणार iPhone चं हे फिचर; किती असेल किंमत?
स्मार्टफोन आणि टेक कंपनी नथिंगचा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. Nothing Phone 3 या नावाने नवीनतम स्मार्टफोन एंट्री करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन अनेक नवीन आणि अपग्रेड फिचर्ससह लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे Nothing Phone 3 मध्ये कंपनी आयफोनचं एक खास फिचर देखील अॅड करणार आहे. त्यामुळे आगामी नाथिंग स्मार्टफोन यूजर्ससाठी खास असणार आहे.
आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंगबाबत सीईओ कार्ल पेई यांनी सांगितलं की, Nothing Phone 3 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लाँच होणार आहे. लाँचपूर्वी, याबद्दल अनेक तपशील समोर आले आहेत, यासह अपेक्षित किंमत देखील जाणून घेण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या फिचर्समुळे आगामी स्मार्टफोनबाबत सर्वांची उत्सुकता वाढली आहे. चला तर मग Nothing Phone 3 च्या फिचर्स आणि किमतींवर नजर टाकुया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Nothing Phone 3 रिलीझ तारखेबाबत अद्याप कंपनीने कोणतेही अधिकृत वक्तव्य शेअर केले नसले, तरी कार्ल पेई यांनी पुष्टी केली आहे की, Nothing Phone 3 हा नवीन स्मार्टफोन 2025 च्या पहिल्या तिमाहीत लाँच केला जाणार आहे. हा फोन फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो. मात्र या लॉचिंग तारीख अद्याप शेअर करण्यात आली नाही. Nothing Phone 3 या सीरिजमध्ये 2 स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, नथिंग फोन 3 मार्केटच्या परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. यात परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8s जनरेशन 3 किंवा MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर मिळू शकतो. यात 6.5-इंच स्क्रीन आणि एक अद्वितीय डिझाइन मिळू शकते.
दुसरीकडे, प्रो व्हेरिएंट 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह 6.67-इंच LTPO AMOLED स्क्रीनसह लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 चिपसेटद्वारे समर्थित असू शकते. हे 12GB पर्यंत RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेजसह येऊ शकते.
कंपनीने सांगितलं आहे की, Nothing Phone 3 डिव्हाइसमध्ये अनेक AI वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाणार आहे. याशिवाय, नथिंग फोन 3 मध्ये आयफोन सारखे कस्टमाइजेबल ॲक्शन बटण देखील दिलं.जाणार आहे. हे Apple च्या iPhone 16 सीरीज मध्ये देखील दिले गेले आहे. त्यामुळे आता युजर्सना बजेट किमतीत ॲक्शन बटणची मजा अनुभवता येणार आहे.
नथिंग फोन 3 ची किंमत सुमारे 45,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे, तर प्रो व्हेरिएंटची किंमत 55,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. मात्र, या किमती लीक झालेल्या अहवालांवर आधारित आहेत. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या किमती शेअर केलेल्या नाहीत.
Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल
Nothing Phone 2 मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि टच सॅम्पलिंग दर 240Hz आहे. फोनचा डिस्प्ले HDR10+ आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह लाँच करण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. यात पारदर्शक बॅक पॅनल आहे.