लाँचपूर्वीच लीक झाला Oppo Find N5 चा लाईव्ह फोटो, कधी लाँच होणार सर्वात पातळ फोल्डेबल फोन? जाणून घ्या
स्मार्टफोन कंपनी Oppo आपला नवीन फोल्डेबल फोन फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी हा नवीनतम फोन Oppo Find N5 या नावाने जगासमोर सादर करणार आहे. कंपनीच्या या आगामी फोनबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. तसेच अनेक लिक्स देखील समोर येत आहेत. आता पहिल्यांदाच या फोनच्या लाईव्ह इमेज लीक झाल्या आहेत.
Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल
ईमेजमध्ये फोनची जाडी किती असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. कंपनीने सांगितलं होतं की, ते सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. लिक्स झालेल्या ईमेजमध्ये देखील फोनची जाडी अतिशय कमी दिसत आहे. या फोनबद्दल सांगितले जात आहे की हा सर्वात पातळ फोल्डेबल फोन असेल. या फोनचे रेंडरही लीक झाले आहेत. चला तर या फोनच्या लीक झालेल्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Oppo Find N5 लाँच होण्यापूर्वी त्याची लाइव्ह इमेज लीक झाली आहे. य़ा लिक ईमेज Alvin नावाच्या ए्क्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत. फोनची आणखी एक इमेज लीक झाली आहे. यामध्ये त्याची तुलना जुन्या मॉडेल Oppo Find N3 शी करण्यात आली आहे. असं सांगितलं जात आहे की Find N5 जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल फोन म्हणून लाँच केला जाईल. यासाठी कंपनी तयारी देखील करत आहे. तर फोनमधील कॅमेरा मॉड्यूल जुन्या मॉडेल्सइतकाच मोठा असेल. हा सर्वात पातळ फोल्डेबल फोन फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कंपनीने कोणतेही अधिकृत वक्तव्य शेअर केलेले नाही.
OPPO Find N5 is extremely thin.
Its executive just shared the real life photos of the phone, and they compared it with the iPhone 16 Pro.
OPPO Find N5 (unfolded):
✅ The phone is almost as thin as the USB-C port itself
✅ As thin as two coins & four credit cards
✅ Around half… pic.twitter.com/fWKXou9Dbc— Alvin (@sondesix) January 19, 2025
लीक झालेल्या इमेजनुसार कॅमेरा सेन्सरच्या प्लेसमेंटमध्ये काही बदल दिसत आहेत. Oppo Find N5 चा कॅमेरा सेन्सर प्लेसमेंट OnePlus 13 प्रमाणेच आहे. कॅमेरा मॉड्यूलच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा वरच्या उजव्या कोपऱ्यात देण्यात आला आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर फोनची जाडी अनफोल्ड अवस्थेत 4mm असू शकते. त्याच वेळी, फोल्ड केल्यानंतर Oppo Find N5 ची जाडी 9 मिमी असू शकते.
स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर लीकनुसार, Oppo Find N5 फोन टायटॅनियम बिल्ड सह लाँच केला जाऊ शकतो. या नवीनतम फोनमध्ये IPX8 रेटिंग देण्याची शक्यता आहे. फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज असू शकतो. हे 50W मेग्नेटिक वायरलेस चार्जिंग आणि 5,700mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 2K रिझोल्यूशन मिळू शकते. हा नवीनतम Oppo Find N5 फोन 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो ज्यामध्ये 3X ऑप्टिकल झूम वैशिष्ट्य असू शकते. मात्र कंपनीने अद्याप या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स कन्फर्म केलेले नाहीत.