Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने त्यांच्या युजर्सना एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात इंस्टाग्रामने अनेक नवीन अपडेट रोलआऊट केले आहेत. ज्यामुळे युजर्सचा इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. कंपनीने नुकतंच एक अपडेट शेअर केल आहे, ज्यामध्ये आपण आपल्या मित्राने लाईक केलेले रिल्स पाहू शकतो. यानंतर आता कपंनीने पुन्हा एक नवीन अपडेट रोलआऊट केले आहेत, ज्यामध्ये रिल्सची टाईमलाईन आणि प्रोफाइल ग्रिडमध्ये बदल करण्यात आला आहे.
सर्वात आधी इंस्टाग्रामवर 30 सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करण्याची परवानगी होती. नंतर ही टाईमलाईन वाढवून 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट करण्यात आली. यानंतर पुन्हा कंपनीने टाईमलाईन वाढवून 90 सेकंदांची केली होती. आता कंपनीने ही टाईमलाईन चक्क 3 मिनिटांची केली आहे. आता युजर्स इंस्टाग्रामवर 3 मिनिटांपर्यंत रिल्स शेअर करू शकणार आहेत. इंस्टाग्रामपूर्वी, यूट्यूबनेही शॉर्ट्स व्हिडिओंचा कालावधी 3 मिनिटांपर्यंत वाढवला होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता क्रिएटर्सनाही इंस्टाग्रामवर लांबलचक रील्स अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे. वास्तविक, आता इंस्टाग्रामवर 3 मिनिटांपर्यंतचे रील अपलोड केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी यूजरच्या प्रोफाइल ग्रिडमध्येही बदल करणार आहे. आता चौकोनी बॉक्सेसऐवजी तुम्हाला आयताकृती बॉक्स दिसतील. येत्या काही दिवसांत, इंस्टाग्राम एक नवीन सेक्शन अॅड करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी लाईक केलेले रिल्स पाहू शकता.
इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी व्हिडिओ जारी करून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की आता तुम्ही इंस्टाग्रामवर 3 मिनिटांचे रील्स अपलोड करू शकाल. यापूर्वी केवळ 90 सेकंदांचे रील अपलोड केले जात होते कारण इंस्टाग्रामचे लक्ष शॉर्ट-व्हिडिओवर होते. अनेक निर्मात्यांनी आम्हाला फीडबॅक दिला की 90 सेकंद खूप लहान आहेत. त्यामुळे आता रिल्सची टाईमलाईन वाढवली जात आहे. यामुळे लोकांना त्यांच्या स्टोरी सांगण्यासाठी मदत होईल, अशी आशा आहे.
आता इंस्टाग्रामवर, प्रोफाइल ग्रिडवर स्क्वेअरऐवजी आयताकृती बॉक्समध्ये कंटेट दिसेल. मोसेरी म्हणाले की काही युजर्सची स्क्वेयरला अधिक पसंती आहे आणि स्क्वेयर फोटो एक प्रकारे इंस्टाग्रामचा वारसा आहे, परंतु या क्षणी जे फोटो अपलोड केले जात आहे ते बहुतेक वर्टिकल ओरिएंटशनमध्ये आहे. ते क्रॉप करणे योग्य नाही. हे फीचर देखील हळूहळू यूजर्ससाठी आणले जात आहे.
तुम्हालाही WhatsApp वर हा मॅसेज आलाय का? थांबा, ओपन करताच व्हाल रशियन हॅकर्सचे शिकार
आणखी एका नवीन फीचरमध्ये, इंस्टाग्राम रिल्स फीडमध्ये एक नवीन टॅब आणणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले किंवा कमेंट केलेले व्हिडिओ दिसतील. हे कंपनीच्या जुन्या ॲक्टिव्हिटी फीडसारखे असेल, ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले व्हिडिओ दाखवले होते.