Nothing Phone 3a मध्ये मिळणार 50MP रिअर कॅमेरा आणि बरंच काही, लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन्स लिक
स्मार्टफोन कंपनी Nothing या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. यावेळी मार्चमध्ये मोठा ईव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी स्मार्टफोनसोबतच काही इतर प्रोडक्ट्स देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. नथिंगने त्याच्या आगामी स्मार्टफोनबद्दल काही स्पेसिफिकेशन्स शेअर केले आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर Nothing चा हा स्मार्टफोन Nothing Phone 3a या नावाने लाँच केला जाऊ शकतो.
Tech Tips: बाथरूमपेक्षाही घाण आहे तुमचा Earphone, आजच अशा पद्धतीने करा क्लिन
Nothing चा आगामी स्मार्टफोन Nothing Phone 3a हा Qualcomm च्या Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर सह लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. Nothing Phone 3a स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरासह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. Nothing चा हा फोन Nothing Phone 2a ची जागा घेईल. आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या स्मार्टफोनचे डिझाईन तरूणांना आकर्षित करणारे असेल यात काही शंका नाही. (फोटो सौजन्य – X)
Nothing Phone 3a लाँच करण्यापूर्वी त्याचे काही स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन समोर आले आहेत. Nothing च्या या फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz असणार आहे. या आगामी फोनचा कोड नंबर A059 आहे, ज्याबद्दल असे सांगितले जात आहे की यामध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. याआधी कंपनीने मागच्या वर्षी लाँच केलेल्या Nothing Phone 2A स्मार्टफोनमध्ये MediaTek चिपसेट दिला होता. नवीन आणि आगामी स्मार्टफोनमध्ये बरेच बदल केले जाण्याची शक्यता आहे.
Nothing Phone 3a च्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, यात Android 15 वर आधारित Nothing OS 3.1 दिले जाईल. हा फोन कंपनीच्या Glyph इंटरफेससह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल असू शकतो. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाईल, जो 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल. यासोबतच फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर दिला जाईल. फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नथिंगच्या आगामी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Starlink बाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच भारतात होणार एंट्री! जाणून घ्या सविस्तर
Nothing Phone 3a बद्दल, असे सांगितले जात आहे की यात 45W चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबतच फोनमध्ये NFC कनेक्टिव्हिटी देखील दिली जाईल. नथिंगचा हा फोन 4 मार्चला रिलीज होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी फोनच्या लाँचचा टिझर जारी केला आहे. सध्या त्याच्या नावाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. मात्र हा आगामी स्मार्टफोन Nothing Phone 3a या नावाने लाँच केला जाण्याची दाट शक्यता आहे.