Tech Tips: बाथरूमपेक्षाही घाण आहे तुमचा Earphone, आजच अशा पद्धतीने करा क्लिन
स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोनसोबत आणखी एका गॅझेटचा वापर देखील वाढला आहे, आणि हे गॅझेट म्हणजे इअरफोन. सध्याच्या डिजीटल काळात इअरफोन आणि हेडफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नेहमी इअरफोन आणि हेडफोन वापरणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. स्मार्टफोन्स, इअरफोन्स आणि हेडफोन्सच्या आगमनाने आपलं आयुष्य खूप सोपं झालं आहे. पण सतत वापरल्या जाणाऱ्या इअरफोन्सच्या स्वच्छतेची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
Aadhaar-Ration Link: घरबसल्या रेशनकार्डशी आधार करा लिंक, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
कानात इअरफोन लावून गाणी ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे फार कमी लोक लक्ष देतात. इअरफोन्स वेळोवेळी स्वच्छ न केल्यास कानाला संसर्गही होऊ शकतो. जर तुम्ही देखील सतत इअरफोनचा वापर करत असाल तर त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमचे इअरफोन्स खराब होऊ शकतात. तुम्ही तुमचे इअरफोन अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
इअरफोन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. प्रथम कोमट पाण्याने कापड ओले करून इअरफोनचे बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करा. साफसफाई करताना इअरफोनवर जास्त जोर देऊ नका, अन्यथा ते डॅमेज होण्याची शक्यता असते. इअरफोनचे रबर किंवा सिलिकॉन इयरटिप्स काढून टाका आणि कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवा. इयरफोन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जंतुनाशक वाइप देखील वापरू शकता. असे केल्याने इअरफोनवरील बॅक्टेरिया तर निघतीलच पण चमकही येईल. त्यामुळे तुमचे इअरफोन अगदी नव्या सारखे चमकू लागतील. इअरफोनचे रबर किंवा सिलिकॉन इयरटिप्स कोमट पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर ते काही काळ सुकण्यासाठी ठेवा आणि नंतर त्याचा वापर करा .
इअरफोनचे छोटे कोपरे आणि ग्रिल स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरड्या किंवा किंचित ओल्या कापसाच्या गोळ्याचा वापर करू शकता. याशिवाय इअरफोनच्या ग्रीलमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करा. इअरफोनचे बाहेरील कोपरे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथब्रश वापरू शकता. बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी तुम्ही इअरफोन आयसोप्रोपाइल अल्कोहोल कापड किंवा स्वॅबने देखील स्वच्छ करू शकता.
इअरफोन्सचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. इयरफोन आणि हेडफोनचा अतिवापर करणे देखील वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकते. इअरफोन्स आणि हेडफोन्सचा जास्त आणि सतत वापर केल्याने तुमच्या कानावर अनेक हानिकारक परिणाम होऊ शकतात. जास्त इयरफोन आणि हेडफोन वापरल्याने तुमच्या कानाला नुकसान होऊ शकते. असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना इअरफोन किंवा हेडफोनद्वारे मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आवडते. परंतु असं करणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
Samsung नवीन Tri-Fold स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
तुम्ही तुमच्या इयरफोनचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त वाढवला तर ते तुमच्या कानाला हानी पोहोचवू शकते. इअरफोन्स आणि हेडफोन्सच्या माध्यमातून गाणी किंवा काहीही जास्त आवाजात ऐकल्याने तुमच्या कानाची प्रत्यक्ष ऐकण्याची क्षमता हळूहळू कमी होते. असे अनेकवेळा घडते की जेव्हा कोणी तुमच्याकडे तुमचे इयरफोन किंवा हेडफोन्स मागितले तर तुम्ही ते लगेच त्याला देता. याशिवाय, तुम्ही कधी कधी दुसऱ्याचे इअरफोन वापरत असाल. पण असं केल्याने तुमच्या कानात संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला नंतर काही गंभीर आजार होऊ शकतात.