BSNL ने युजर्सना दिलं अनोखं Christmas गिफ्ट! 1 महिना फ्री मिळणार ही सर्विस, काय असणार अट?
वर्ष संपायला अगदी काहीच दिवस शिल्लक असताना आता सरकारी टेलिकॉन कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांना एक सरप्राईज दिलं आहे. BSNL आपल्या ग्राहकांना 1 महिन्यासाठी मोफत इंटरनेट देणार आहे. पण यासाठी एक अट आहे. ही अट म्हणजे तुमच्याकडे BSNL चा फायबर ब्रॉडबँड असणं गरजेचं आहे आणि तुमचे मासिक भाडे 500 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तुम्ही या दोन्ही अटी पूर्ण करत असाल तर अभिनंदन, तुम्हाला देखील कंपनी 1 महिन्यासाठी मोफत इंटरनेट ऑफर करणार आहे.
LG चा पहिला ट्रान्सपरंट TV लाँच, किंमत 50 लाखांहून अधिक; काय आहे खास? जाणून घ्या
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर आणली आहे. तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर घाई करावी लागणार आहे. कारण ही ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे. चला तर मग BSNL च्या या ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही फायबर बेसिक निओ किंवा फायबर बेसिक प्लॅनवर एक महिन्याचे इंटरनेट मोफत वापरू शकता. पण या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा प्लॅन किमान 3 महिन्यांसाठी खरेदी करावा लागणार आहे. तुम्ही बीएसएनएलचा तीन महिन्यांचा फायबर बेसिक निओ किंवा फायबर बेसिक प्लॅन खरेदी केल्यास तुम्ही यामध्ये एक महिन्यासाठी फ्री इंटरनेट ऑफर केलं जाणार आहे.
म्हणजेच तुम्ही तीन महिन्यांच्या प्लॅनच्या खर्चात 4 महिन्यांसाठी इंटरनेटचा वापर करू शकणार आहात. ही ऑफर केवळ 31 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करा आणि आत्ताच बीएसएनएलचा तीन महिन्यांचा फायबर बेसिक निओ किंवा फायबर बेसिक प्लॅन खरेदी करा.
बीएसएनएल फक्त 449 रुपयांमध्ये एक उत्तम ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनचे नाव आहे फायबर बेसिक निओ. यामध्ये तुम्हाला वेगवान इंटरनेट मिळेल, म्हणजेच 30 मेगाबाइट्स प्रति सेकंदाचा वेग. या स्पीडसह, तुम्ही एका महिन्यात 3300 GB डेटा वापरू शकता, म्हणजेच दररोज 100 GB पेक्षा जास्त डेटा उपलब्ध असणार आहे. सगळा डेटा संपल्यानंतरही तुम्ही स्लो स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याच्या मदतीने तुम्हाला घरातील कुठूनही अनलिमिटेड कॉल्स करण्याची सुविधा मिळेल. जर तुम्ही हा प्लॅन तीन महिन्यांसाठी घेतला तर तुम्हाला 50 रुपयांची सूटही मिळेल.
Oppo A5 Pro 5G: Oppo चा नवीन प्रिमियम स्मार्टफोन लाँच, स्पेसिफीकेशन्स वाचून व्हाल हैराण
बीएसएनएलचा फायबर बेसिक नावाचा प्लॅन आहे, त्याची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिशय वेगवान इंटरनेट मिळेल, म्हणजेच 50 मेगाबाइट्स प्रति सेकंदाचा वेग. तुम्ही एका महिन्यात 3300 GB डेटा वापरू शकता. सर्व डेटा संपल्यानंतरही तुम्ही स्लो स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याच्या मदतीने तुम्हाला घरातील कुठूनही अनलिमिटेड कॉल्स करण्याची सुविधा मिळेल. तुम्ही हा प्लान तीन महिन्यांसाठी घेतल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूटही मिळेल. पण ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंतच आहे.