CES 2025: सुरु झाला नवीन वर्षाचा पहिला सर्वात मोठा टेक शो, काय असणार खास? कोणते डिव्हाईस होणार लाँच, जाणून घ्या सविस्तर
2024 मध्ये अनेक नवीन गोष्टी जगासमोर आल्या आहेत, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली. आता नवीन वर्षात तंत्रज्ञान क्षेत्र नव्या उमेदिने जगासमोर येण्यासाठी सज्ज झाले आहे. 2025 या नवीन वर्षाचा पहिला सर्वात मोठा टेक शो CES 2025 आयोजित करण्यात आला आहे. लास वेगास येथे आज 7 जानेवारीपासून ते 10 जानेवारीपर्यंत हा टेक शो सुरु राहणार आहे. यामध्ये जगभरातील अनेक तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
CES, म्हणजे “कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो”, हे जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञानावर आधारित व्यापार संमेलनांपैकी एक आहे. हे दरवर्षी लास वेगास, नेवाडा येथे आयोजित केले जाते. या ईव्हेंटमध्ये Samsung, Sony, LG, Google, Meta, Nvidia, AMD, Qualcomm आणि Lenovo या टेक कंपन्या, Honda, Volvo, BMW आणि Waymo सारख्या ऑटोमोबाईल कंपन्या, इरिडियम, ग्लोबलस्टार आणि स्पेसएक्सचे स्टारलिंक आणि इतर हजारो प्रदर्शक सहभागी होतात. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये 135,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
CES च्या X हँडल व्यतिरिक्त, तुम्ही हा ईव्हेंट YouTube चॅनल, TikTok, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
CES 2025 मध्ये तुम्हाला दिवा असलेले स्टूल हलताना दिसत असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण हा Mi-Mo आहे, एक अनोखा AI-पावर्ड रोबोट. Mi-Mo ने CES मीडिया इव्हेंटमध्ये पदार्पण केले. हे जपानी रोबोटिक्स कंपनी Jizai ने तयार केले आहे. “कस्टमाइजेबल जनरल-पर्पस एआई रोबोट”, म्हणून Mi-Mo लाँच करण्यात आला आहे.
जिझाईचे सीईओ आणि निर्माते युकी इशिकावा म्हणाले की Mi-Mo एकाधिक एआय मॉडेल्स वापरते, जे व्हिडिओ, ऑडिओ आणि हालचाली सिग्नलवर आधारित स्वतः विचार करण्याची आणि कार्य करण्याची क्षमता देते. सॉफ्टवेअर कस्टमाइज त्याचे AI मॉडेल कस्टमाइज करू शकतात आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी ॲप्स देखील तयार करू शकतात. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर Mi-Mo हे फर्निचर सारखे दिसावे असे बनवले आहे. Mi-Mo ची हालचाल एखाद्या “जिवंत वस्तू” सारखी वाटते.
CES 2025 मध्ये LG Electronics ने त्याच्या 2025 OLED Evo लाइनअपचे अनावरण केले आहे. यामध्ये कंपनीने टीव्हीची नवीन रेंज सादर केली आहे. यामध्ये LG OLED evo G5 आणि OLED evo M5 नावाचा जगातील पहिला True Wireless OLED TV समाविष्ट आहे.
iPhone च्या चार्जरची कटकट संपली, Portronics वायरलेस चार्जिंग स्टँड ठरेल उपयुक्त! केवळ इतकी आहे किंमत
LG ने सांगितले की, त्याच्या M5 सीरीज, जगातील पहिला True Wireless OLED TV चे OLED evo M5 असे नाव आहे. त्याच्या मदतीने, हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओ वायरलेस पद्धतीने ट्रांसफर केले जाऊ शकतात, जे 144Hz पर्यंत रिफ्रेश दरांना सपोर्ट करते. या कालावधीत, व्हिडिओ आणि ऑडिओ क्वालिटी कोणत्याही प्रकारे डाउन होत नाही. एलजीचा हा स्मार्ट टीव्ही गेमर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे. हे 4K रिझोल्यूशन, 165Hz व्हेरिएबल रिफ्रेश दर आणि Nvidia G-Sync आणि AMD FreeSync ला सपोर्ट करते.
Google ने CES 2025 मध्ये जाहीर केले आहे की ते यावर्षी Google TV वर Gemini AI चा सपोर्ट अॅड करणार आहे. कंपनीने Google TV साठी अनेक नवीन AI वैशिष्ट्यांचे अनावरण केले आहे. Google ने सांगितले की, ‘या वर्षीच्या CES मध्ये, आम्ही Google TV साठी नवीन AI क्षमतांचे प्रिव्यू शेअर केले आहे जे तुमच्या टीव्हीशी परस्परसंवाद अधिक सहज आणि उपयुक्त बनवण्यासाठी आमचे जेमिनी मॉडेल वापरतात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब एकत्र जमू शकता आणि तुमच्या टीव्हीवर नैसर्गिकरित्या संवाद साधू शकता.