iPhone च्या चार्जरची कटकट संपली, Portronics वायरलेस चार्जिंग स्टँड ठरेल उपयुक्त! केवळ इतकी आहे किंमत
तुम्ही देखील आयफोन युजर आहात का, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे आयफोनचा चार्जर. असे देखील अनेक लोकं तुम्ही पाहिले असतील, की ते त्यांच्या आयफोनपेक्षा जास्त चार्जरची काळजी घेतात. तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक आहात का? तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक कंपनी Portronics ने आयफोनसाठी वायरलेस चार्जर लाँच केला आहे. ज्यांच्या चार्जरची केबल सतत खराब होते, किंवा हरवते अशा लोकांसाठी हा आयफोनचा वायरलेस चार्जर फायद्याचा ठरणार आहे.
आता WhatsApp चॅटिंगमध्ये मिळणार अॅनिमेशनची मजा, लवकरच येणार नवीन वर्षाचं पहिलं अपडेट
Portronics ने नुकतेच आयफोन वापरकर्त्यांसाठी फ्लक्स वायरलेस चार्जिंग स्टँड लाँच केले आहे. हे आयफोनसह सर्व Qi2 डिव्हाईसला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे आता चार्जरच्या केबलची चिंता सोडा, कारण तुमच्यासाठी आता Portronics ने लाँच केलेले फ्लक्स वायरलेस चार्जिंग स्टँड जास्त फायद्याचं ठरणार आहे. फ्लक्स स्टँड कॉम्पॅक्ट आणि हलके आहे. ज्यामुळे तुम्ही हे स्टँड प्रवासात देखील सहज घेऊन जाऊ शकता. त्याची किंमत किती आहे आणि कुठे खरेदी करता येईल, याबद्दल जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
FLUX वायरलेस चार्जिंग स्टँड दोन्ही पोट्रेट आणि लँडस्केप चार्जिंग मोडला सपोर्ट करते. हे 15W चार्जिंग आउटपुट देते. हे आयफोन 12 ते 16 सीरीजला जलद पॉवर प्रदान करू शकते. याच्या मदतीने वायरलेस इअरबड्स आणि सर्व Qi2 इनेबल्ड डिवाइस चार्ज करता येतात. सुरक्षित चार्जिंग अनुभव देण्यासाठी हे MagSafe टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.
फ्लक्स स्टँडमध्ये सॉफ्ट एलईडी नाईट लाइट देण्यात आला आहे, जो ॲडजस्टेबल ब्राइटनेस लेव्हलसह येतो. सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली गेली आहे, त्यात टेंपरेचर कंट्रोल, ओवर करंट प्रोटेक्शन आणि शॉर्ट-सर्किट प्रोटेक्शन यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रदान केलेली एफिशिएंट हीट डिसिप्शन सिस्टम आणि टेंप गार्ड टेक्नोलॉजी ओवरहीट होण्यापासून रोखते.
FLUX वायरलेस चार्जिंग स्टँडची किंमत 1,399 रुपये आहे. हे कंपनीच्या अधिकृत साइटवरून खरेदी केले जाऊ शकते. FLUX वायरलेस चार्जिंग स्टँड ऑनलाइन शॉपिंग साइट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही उपलब्ध आहे. यावर 12 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे.
Realme 14 Pro सीरीजचं लाँच कन्फर्म, कलर चेंजिंग डिझाईनसह या दिवशी एंट्री करणार नवीन स्मार्टफोन
वायरलेस चार्जिंगला इंडक्टिव चार्जिंग असेही म्हणतात. हे डिवाइसमधील इलेक्ट्रिक एनर्जी हस्तांतरित करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरते. वायरलेस चार्जिंगसाठी चार्ज होत असलेले डिव्हाइस विशिष्ट ठिकाणी (पॉवरमॅट किंवा डॉक) ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा फोन चार्ज होणार नाही. तुमचा फोन रात्रभर चार्जवर ठेवल्याने बॅटरी सकाळपर्यंत डेड होऊ शकते.