भारतातील पहिले सबस्क्रिप्शन आधारित TV OS लाँच, 24 OTT आणि 300 हून अधिक चॅनेल केवळ इतक्या रुपयांत उपलब्ध
लोकप्रिय टेक कंपनी Streambox Media ने भारतातील पहिला सबस्क्रिप्शन आधारित Dor QLED OS TV लाँच केला आहे. Streambox Media ने सबस्क्रिप्शन मॉडेलसह पहिला Dor QLED TV लाँच केला आहे. या टीव्हीसोबत, कंपनी वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन प्लॅन देखील ऑफर करत आहे, ज्यामध्ये अनेक लोकप्रिय 24 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वापरकर्त्यांना या टीव्हीसह 24 पेक्षा जास्त OTT ॲप्स आणि 300 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेलची मेंबरशिप मिळणार आहे. Amazon Prime Video, JioCinema, Disney+ Hotstar, SonyLIV, YouTube, Lionsgate Play, Zee5 या ओटीटी ॲप्सचा समावेश असणार आहे. कंपनी वापरकर्त्यांना OTT प्लॅटफॉर्म, लाइव्ह चॅनेल, गेमिंग आणि बातम्यांसह 4K QLED टीव्ही देत आहे. हा टीव्ही Door TV OS वर चालतो. या टिव्ही सिस्टममध्ये AI पॉवर्ड सर्च फीचर देखील देण्यात आले आहेत. ओटीटी ॲप्सची संख्या जास्त असल्याने युजर्स त्यांच्या आवडीचे कार्यक्रम आणि शो पाहू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंचाचा QLED4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. हे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करते. टीव्हीमध्ये 40W स्पीकर, व्हॉईस सर्च, सोलर पॉवर रिमोट आहे. रिमोटला इनडोअर आणि आउटडोअर लाइटिंग वापरून अगदी सहजपणे चार्ज करता येते.
कंपनी या टीव्हीसोबत चार वर्षांची वॉरंटी देते आणि उत्पादन अपग्रेड पर्याय देखील देते. यामध्ये स्पोर्ट आणि सिनेमा मोड उपलब्ध आहेत. टीव्ही ड्युअल वाय-फाय बँड आणि ब्लूटूथसह लाँच करण्यात आला आहे. टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
या टीव्हीची विक्री 1 डिसेंबर 2024 पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या टीव्हीची किंमत 10,799 रुपये आहे. यामध्ये अॅक्टिव्हेशन फी आणि एक महिन्याचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. यानंतर, दुसऱ्या महिन्यापासून ते 12 व्या महिन्यापर्यंत सबस्क्रिप्शनची किंमत प्रति महिना 799 रुपये असेल.
यानंतर, वापरकर्ते प्लॅन कस्टमाइझ करू शकतील. युजर्स 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत प्लॅन खरेदी करू शकतील. याचा अर्थ टीव्ही आणि एक वर्षाच्या सबस्क्रिप्शनची संपूर्ण किंमत 19,588 रुपये आहे. एवढेच नाही तर एक वर्ष टीव्ही वापरल्यानंतर टीव्ही परत केल्यास युजर्सना 5000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा टिव्ही 43 इंच, 55 इंच आणि 65 इंच या तीन आकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या घराच्या आकारानुसार टिव्हीची खरेदी करू शकता. यातील 43 इंचाचे मॉडेल 1 डिसेंबर 2024 पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर 55 इंच आणि 65 इंच हे दोन्ही मॉडेल पुढील वर्षांपासून विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना या दोन मॉडेलच्या खरेदीसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.