Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink बाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच भारतात होणार एंट्री! जाणून घ्या सविस्तर

दूरसंचार विभागाकडून परवाना मिळवण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा देशातच ठेवावा लागणार, अशी अट स्टारलिंकसमोर ठेवण्यात आली होती. आता कंपनीने ही अट मान्य करत आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 29, 2025 | 12:31 PM
Starlink बाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच भारतात होणार एंट्री! जाणून घ्या सविस्तर

Starlink बाबत समोर आली नवीन अपडेट, लवकरच भारतात होणार एंट्री! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

एलॉन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकबाबत आता एक नवीन अपडेट समोर आलं आहे. स्टारलिंक तिच्या प्रक्षेपणाच्या एक पाऊल जवळ आली आहे. त्यामुळे भारतात लवकरच स्टारलिंक सेवा सुरु केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकन अब्जाधीश एलोन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट प्रदान करणारी कंपनी Starlink ने परवाना मिळवण्यासाठी भारत सरकारच्या अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता Starlink चा भारतातील मार्ग मोकळा झाला आहे.

5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने सरकारने घातलेल्या सुरक्षा आणि डेटा स्टोरेजच्या अटी देखील मान्य केल्या आहेत, तर कंपनीने काही अटींमध्ये शिथिलता मागितली आहे, परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की आंतरराष्ट्रीय कंपन्यांना तसे करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे सरकारच्या अटी मान्य करत स्टारलिंक त्याच्या ध्येयाच्या आणखी जवळ आला आहे. त्याची बीटा चाचणी देखील आता सुरु केली जाणार आहे. स्टारलिंकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना मोबाईल टॉवरशिवाय फोन सेवा उपलब्ध होणार आहे. स्टारलिंक स्मार्टफोन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डेटा स्टोरेज संबंधित महत्त्वाची अट

दूरसंचार विभागाकडून परवाना मिळवण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा देशातच ठेवावा लागणार, अशी अट ठेवण्यात आली होती. याशिवाय गरज पडल्यास गुप्तचर संस्थांना डेटा इंटरसेप्ट करण्याची सुविधा देण्याचाही अटींमध्ये समावेश आहे. स्टारलिंकने या दोन्ही अटी मान्य केल्या आहेत. कंपनीकडून यासंदर्भातील पत्र प्राप्त झाल्यानंतर सरकारने कोणताही खुलासा मागितलेला नाही. सध्या गृह मंत्रालय आणि सुरक्षा संस्था कंपनीच्या अर्जावर विचारविनिमय करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून, स्टारलिंक सातत्याने आपले सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्क वाढवत आहे. TweakTown च्या अहवालानुसार , वापरकर्ते आता 250-350Mbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकतात. इलॉन मस्कचे हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य नक्कीच पूर्णपणे बदलून जाईल. याचा दूरसंचार उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्पेक्ट्रम वाटपावरही काम सुरू आहे

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) उपग्रह इंटरनेटसाठी स्पेक्ट्रम वाटप आणि किंमत निश्चित करण्यात व्यस्त आहे. या वर्षाअखेरीस देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे आहे. जिओ आणि एअरटेललाही भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करायची आहे. मात्र याबाबत अद्याप कोणते अपडेट हाती आलेले नाही. मात्र स्टारलिंकबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत.

Android युजर्सना मिळणार सुपरपॉवर! स्मार्टफोन चोरी झाला तरी डेटा राहणार सुरक्षित, Google ने आणलं अप्रतिम फीचर

स्टारलिंक सेवा महाग होण्याची शक्यता

भारतात या वर्षाच्या अखेरीस स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र ही सेवा महाग असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. काही रिपोर्ट्सनुसार कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत 850 रुपयांपासून अनेक हजारांपर्यंत असू शकते. याशिवाय, इंस्टॉलेशनच्या वेळी हार्डवेअरची किंमत 20,000-30,000 रुपये असू शकते. मात्र, ही सेवा दुर्गम भागात इंटरनेट देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Tech news new update about starlink when will it comes in india know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
1

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
2

Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
3

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका
4

Elon Musk : इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप भारत सरकारने फेटाळले; सॅटेलाईट इंटरनेट धोरणावर स्पष्ट केली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.