5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
स्मार्टफोन कंपनी Infinix ने आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Infinix Smart 9HD या नावाने लाँच करण्यात आला आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सही देण्यात आले आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन कमी बजेटमध्ये अनेक फीचर्स देऊन ग्राहकांना आकर्षिक करत आहे. हा नवीन स्मार्टफोन रेडमी 14C सारख्या बजेट फोनला थेट स्पर्धा देण्यासही सक्षम आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देखील मिळेल जी दीर्घकाळ फोन चार्ज ठेवण्यास सक्षम आहे. (फोटो सौजन्य – X)
IP54 रेटिंग – Infinix Smart 9 HD स्मार्टफोन अनेक नवीन फीचर्स आणि Smart 8 HD ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांच्या सेगमेंटमधील हा सर्वात मजबूत स्मार्टफोन आहे. त्याची 2,50,000 वेळा चाचणी घेण्यात आली आहे, ज्यावरून त्याच्या मजबूत बिल्ड गुणवत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो. यासोबतच या स्मार्टफोनला IP54 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करेल.
डिस्प्ले – यात 6.7 इंचाचा HD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट आणि 500 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Helio G50 चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम (3 व्हर्च्युअल रॅम) आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.
बॅटरी – पॉवरसाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 14.5 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक आणि 8.6 तास गेमिंगचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. यासोबतच हा डिवाइस Android 14 Go Edition ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Time aa gaya hai SWAG se SOLID hone ka!
The Infinix SMART 9HD is here at just ₹6,199*!
Sale begins 4th Feb.
Check it out: https://t.co/Vxp66p1VFU pic.twitter.com/rq9onnwqUH
— Infinix India (@InfinixIndia) January 28, 2025
कॅमेरा – कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 13MP रियर कॅमेरा (ड्युअल फ्लॅशसह) आहे. तसेच, सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Infinix Smart 9 HD स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Infinix ने Smart 9 HD स्मार्टफोन 6199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मिंट ग्रीन, कोरल गोल्ड आणि मेटॅलिक ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हा नवीनतम स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याची विक्री 4 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.
स्वदेशी कंपनीने लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन! 5000mAh बॅटरीने सुसज्ज, किंमत केवळ इतकी
Redmi 14C हा Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. Infinix चा नवीन फोन Redmi 14C ला टक्कर देऊ शकतो, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. Redmi 14C मध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे. हा फोन Mediatek Helio G81 अल्ट्रा चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 हायपर ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी आहे जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.