Airtel वायफाय ग्राहकांना आता मिळणार Zee 5 चा आनंद! भागिदारीनंतर काय आहेत कंपनीचे नवीन प्लॅन्स? जाणून घ्या सविस्तर
जर तुम्ही Airtel चा वायफाय वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्व एअरटेल वायफाय ग्राहकांना आता 1800 हून अधिक टीव्ही शो, 4000 हून अधिक चित्रपटांची संपूर्ण यादी (कॅटलॉग) आणि विविध भाषांमधील लोकप्रिय वेब सीरिज मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण Airtel ने Zee 5 सोबत भागिदारी केली आहे. या भागिदारीनंतर Airtel वायफाय ग्राहकांना आता Zee 5 वरील शो, चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेता येणार आहे.
699 रुपयांपासून सुरु होणाऱ्या Airtel वायफायच्या प्लॅनवर आता ग्राहकांना Zee 5 चा देखील आनंद घेता येणार आहे. कोणतीही अतिरिक्त रक्कम न भरता तुम्ही Zee 5 वरील 1800 हून अधिक टीव्ही शो, 4000 हून अधिक चित्रपटांची संपूर्ण यादी (कॅटलॉग) आणि विविध भाषांमधील लोकप्रिय वेब सीरिज मोफत पाहू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
भारती एअरटेल भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि तिने भारतातील अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 सोबत भागीदारी केली आहे, असे आज जाहीर केले असून आपल्या वायफाय ग्राहकांना आकर्षक डिजिटल कंटेट प्रदान करणार आहे. 699 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीपासून सुरू होणारे प्लॅन्स घेतलेल्या सर्व ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त रक्कम न भरता त्यांच्या एअरटेल वायफाय प्लॅनचा भाग म्हणून Zee 5 वरील टीव्ही शो, चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेता येणार आहे.
ही भागीदारी झाल्यावर, मूळ शोज, चार्टबस्टर टायटल्स, अनेक भाषांमधील ओटीटी चित्रपट आणि वेब सिरीजचा समावेश असलेला Zee 5 चा खास कंटेट आता प्रेक्षकांसाठी एअरटेल वायफायवर उपलब्ध केले जाणार असून त्यांना डिजिटल कंटेटची संपूर्ण यादी (कॅटलॉग) उपलब्ध होणार आहे. इतरांमध्ये सॅम बहादूर, आरआरआर, सिर्फ एक बंदा काफी है, मनोरथंगल, विक्कटकवी, द क्रॉनिकल्स ऑफ अमरागिरी, ऐंधमवेधम, ग्याराह ग्याराह यासारख्या लोकप्रिय शीर्षकांसह एअरटेल वायफाय ग्राहकांना आता 1.5 लाख+ तासांच्या कंटेटचा आनंद घेता येणार आहे.
Samsung चा नवीन स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट, लाँचिगपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लिक
अमित त्रिपाठी, मुख्य विपणन अधिकारी आणि ईव्हीपी ग्राहक अनुभव, भारती एअरटेल, म्हणाले, “भागीदारी एअरटेलच्या डी.एन.ए च्या केंद्रस्थानी आहे आणि आम्ही आनंदाने Zee 5 सोबत भागीदारी केली आहे. एअरटेल वायफाय वापरताना वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी ही भागिदारी करण्यात आली आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम आनंद देण्याचा एकेरी अजेंडा हाती घेऊन आमचा सामग्री पोर्टफोलिओ तयार करण्याची बांधिलकी आम्ही स्वीकारली आहे. एअरटेल थँक्स ॲपच्या माध्यमातून एअरटेल वायफाय ग्राहकांना मोफत ऑफरचा दावा करता येईल.”
ही भागीदारी एअरटेलचा वायफाय + टीव्ही ऑफरला अजून वाढवते, ज्यात 350 हून अधिक एचडी चॅनल्स आहेत आणि ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम प्ले उपलब्ध करून देत आहे. एअरटेल एक्सट्रीम प्ले एक असा व्यापक प्लॅटफॉर्म आहे जो सोनीलिव्ह, इरोसनाऊ, सननेक्स्ट, एएचए आणि इतर बऱ्याच गोष्टींतून 23 लोकप्रिय ओटीटी सेवांमधून कंटेट एकत्रित करतो. एअरटेल वायफाय ग्राहकांना मनोरंजनाच्या पर्यायांचा अप्रतीम खजिना उपलब्ध करून देत आहे.
699 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 एमबीपीएस पर्यंत स्पीड ऑफर केली जाते. यामध्ये 350+ टीव्ही चॅनल्सचा समावेश आहे. शिवाय झी5, डिस्ने + हॉटस्टार, 22+ ओटीटी सारखे फायदे देखील यामध्ये उपलब्ध आहेत. 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड ऑफर केली जाते. यामध्ये 350+ टीव्ही चॅनल्सचा समावेश आहे. तसेच झी5, डिस्ने + हॉटस्टार, 22+ ओटीटी सारखे फायदे देखील यामध्ये उपलब्ध आहेत. 1099 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 एमबीपीएस पर्यंत स्पीड ऑफर केली जाते. यामध्ये 350+ टीव्ही चॅनल्स टिव्ही चॅनल्सचा समावेश आहे. तसेच झी5, ॲमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, 22+ ओटीटी सारखे फायदे देखील यामध्ये उपलब्ध आहेत.
1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 एमबीपीएस पर्यंत स्पीड ऑफर केली जाते. यामध्ये 350+ टीव्ही चॅनल्सचा समावेश आहे. यामध्ये झी5, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, 22+ ओटीटी सारखे फायदे देखील यामध्ये उपलब्ध आहेत. 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबीपीएस पर्यंत स्पीड ऑफर केली जाते. यामध्ये 350+ टीव्ही चॅनल्सचा समावेश आहे. यामध्ये झी5, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, डिस्ने + हॉटस्टार, 22+ ओटीटी सारखे फायदे देखील यामध्ये उपलब्ध आहेत.