Samsung चा नवीन स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट, लाँचिगपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लिक
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Samsung दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे आगामी दोन्ही स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट झाले आहेत. Samsung चे नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M16 5G आणि Galaxy F16 5G या नावाने लवकरच लाँच केले जाऊ शकतात. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. लिक झालेल्या स्मार्टफोननुसार हे दोन्ही स्मार्टफोन कमाल फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत.
Year Ender 2024: OnePlus पासून Samsung पर्यंत, हे आहेत यावर्षी लाँच झालेले बजेट स्मार्टफोन्स
Samsung Galaxy M16 5G आणि Galaxy F16 5G हे दोन्ही आगामी फोन अलीकडेच वाय-फाय अलायन्स, बीआयएस आणि गीकबेंच सारख्या विविध ऑनलाइन साईट्सवर लिस्ट झाले आहेत. या व्यतिरिक्त, दोन्ही डिव्हाईसचे रेंडर देखील समोर आले आहेत, जे त्यांच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती देतात. (फोटो सौजन्य – pinterest)
Galaxy M16 5G स्मार्टफोनमध्ये पिल-शेप्ड रियर कॅमेरा मॉड्यूल असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये तीन वर्टिकल अलाइंड सेंसर आणि LED फ्लॅश समाविष्ट आहे. आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते शार्प फ्लॅट एजसह लाँच केले जाऊ शकते. ज्यामध्ये उजव्या बाजूला पॉवर बटण, व्हॉल्यूम कंट्रोल, फिंगरप्रिंट सेन्सर आणि डाव्या बाजूला स्लिम स्लॉट असेल. तर सेल्फी कॅमेऱ्यासाठी समोर Infinity-U नॉच देण्यात येईल.
गीकबेंच सूचीनुसार, Galaxy M16 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असू शकतो, जो 8GB पर्यंत रॅम व्हेरिअंटसह येतो. हा फोन Android 14 वर चालेल. हा फोन ड्युअल बँड 2.4GHz, Wi-Fi a/b/g/n/ac, 5GHz, Wi-Fi डायरेक्ट आणि WPA2/WPA3 सुरक्षा प्रोटोकॉलसह लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus 13 च्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला हा स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळणार महागड्या फोनचे फीचर्स
Galaxy F16 5G चे रेंडर जे SmartPrix द्वारे प्रकाशित केले गेले होते, ते Galaxy M16 5G सारखेच डिझाइन दाखवतात. यात मेटल रियर कॅमेरा आईलँड आहे, ज्यामध्ये तीन वर्टिकल आलाइंड सेन्सर आहेत. हे डिवाइस सॉलिड आणि ग्रेडिएंट कलरवेसह विविध फिनिशमध्ये उपलब्ध असेल.
लीकवर विश्वास ठेवला तर, Galaxy F16 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ Infinity-U सुपर AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. हे डिवाइस MediaTek Dimension 6300+ चिपसेटसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या आगामी स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर असू शकतो.
याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung चे F16 5G आणि M16 5G स्मार्टफोन येत्या आठवड्यात भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. फ्लिपकार्टद्वारे F16 5G आणि Amazon द्वारे M16 5G ऑफर होण्याची शक्यता आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर केली नाही. मात्र लवकरच हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे.