Apple कडून ग्राहकांना Christmas चं गिफ्ट, या लेटेस्ट iPhone वर जबरदस्त डिस्काउंट! या ठिकणांहून करा खरेदी
दरवर्षीप्रमाणे यंदाही टेक जायंट कंपनी ॲपलने त्यांचा नवीन iPhone लाँच केला. कंपनीने सप्टेंबर महिन्यात iPhone 16 लाँच केला. या सिरीजमध्ये कंपनीने 4 मॉडेल लाँच केले, ज्यामध्ये आयफोन 16, 16 प्लस, 16 प्रो आणि 16 प्रो मॅक्स यांचा सामावेश आहे. iPhone 16 चा बेस मॉडेल जागतिक स्तरावर 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. iPhone लाँच होताच त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.
Year Ender 2024: OnePlus पासून Samsung पर्यंत, हे आहेत यावर्षी लाँच झालेले बजेट स्मार्टफोन्स
तुम्ही देखील हा iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी या लेटेस्ट iPhone वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यामुळे आता तुम्ही iPhone 16 कमी किंमतीत खरेदी करू शकता. ॲपलने ख्रिसमस कार्निव्हल सेलचे आयोजन केले आहे. या सेल दरम्यान ॲपलच्या खास रिटेल स्टोअर इमॅजिनवर iPhone 16 स्मार्टफोनवर चांगली सूट मिळत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ख्रिसमस कार्निव्हल सेलसाठी, ॲपलने अनेक बँका आणि ऑनलाइन वापरलेल्या डिव्हाइस मार्केटप्लेस कॅशिफायशी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून, ग्राहकांना अतिरिक्त बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर अंतर्गत आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आयफोन 16 मॉडेल्सना एक ॲक्शन बटण देण्यात आले आहे, जे मागील वर्षी फक्त iPhone 15 प्रो मॉडेल्ससाठी उपलब्ध होते आणि एक नवीन कॅमेरा कंट्रोल बटण देखील आहे. या खास फिचर्समुळे iPhone 16 अत्यंत खास बनला आहे.
iPhone 16 चा 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंट 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. पण आता तुम्हाला हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ॲपलचे Imagine Store मधील या डीलमुळे ग्राहकांना आयफोन 16 च्या खरेदीवर 3,500 रुपयांची झटपट सूट मिळू शकते आणि या डिस्काउंटनंतर आयफोन 16 चे बेस मॉडेल 76,400 रुपयांना खरेदी करता येते. तथापि, खरेदीदाराने ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक किंवा SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास, त्याला 5,000 रुपयांचा कॅशबॅक देखील ऑफर केलं जाणार आहे.
OnePlus 13 च्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला हा स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळणार महागड्या फोनचे फीचर्स
Cashify द्वारे जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून अतिरिक्त सवलतींचा लाभ देखील घेता येतो. कंपनीने सांगितले की खरेदीदार डिव्हाइसची देवाणघेवाण करून एक्सचेंज बोनस म्हणून 8,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. त्यामुळे तुम्ही आयफोन 16 आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
विशेष बाब म्हणजे iPhone 16 तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB यांचा सामावेश आहे. या ऑफर प्रत्येक स्टोरेज व्हेरिअंटवर लागू आहेत. हा स्मार्टफोन ब्लॅक, पिंक, टील, अल्ट्रामॅरिन आणि व्हाइट कलर पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
iPhone 16 मध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाईड सेन्सर देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेन्सर मॅक्रो फोटोग्राफीलाही सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. कंपनीने या फोनमध्ये नवीन कॅमेरा कंट्रोल बटण दिले आहे. iPhone 16 हा Apple Intelligence वर आधारित आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फोन आहे. ही सिरीज नवीनतम A18 चिपवर आधारित, नवीन iPhone मागील सिरीजपेक्षा 40 टक्के वेगवान आणि 14 सिरीजपेक्षा दुप्पट वेगवान आहे.
आयफोन 16 मध्ये 6.3 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. iPhone 16 हा iPhone 15 पेक्षा दोन तास अधिक व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करतो. यामध्ये ड्युअल सिमचा पर्याय आहे, ज्यामध्ये दोन्ही ई-सिम किंवा एक नॅनो सिम आणि दुसरे ई-सिम स्थापित केले जाऊ शकतात.