Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!

सरकार आपले ॲप्स युजर्ससाठी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, यासाठी तयारी सुरु आहे. सरकारच्या या नवीन योजनेमुळे स्मार्टफोन युजर्सचं कामं बरचं कमी होणार आहे. मात्र गुगलने सरकारच्या या उपक्रमाला विरोध केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2025 | 09:42 AM
सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!

सर्व सरकारी Apps आता एकाच ठिकाणी होणार उपलब्ध, Apple आणि Google कडे मागितला मदतीचा हात!

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक सरकारी ॲप्स असतात. हे ॲप्स आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी मदत करतात. पण हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरावे लागतात. मात्र आता भारत सरकार एका मोठ्या तयारीत आहे, ज्यामुळे युजर्सना सर्व सरकारी ॲप्स एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. वास्तविक, भारत सरकार आपले सर्व ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर गोळा करण्याची तयारी करत आहे.

JIO ने लाँच केले नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, इंटरनेट डेटा नाही तर मिळणार केवळ या सुविधा

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने याबाबत ॲपल आणि गुगलला पत्र लिहिले आहे. यासोबतच स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनाही या दिशेने सहकार्य करण्यास सांगितले आहे. ज्यामुळे आता युजर्सना अधिकृत सरकारी ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची गरज नाही. सरकारच्या या नवीन योजनेमुळे स्मार्टफोन युजर्सचं कामं बरचं कमी होणार आहे. सरकारची ही नवीन योजना नक्की आहे, याबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

सरकार स्वतःचे ॲप संच आणणार आहे

वास्तविक, सरकार आपले ॲप्स ॲप संचावर उपलब्ध करून देईल. सरकारने गुगलला लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, गुगलने वापरकर्त्यांना हे ॲप संच त्यांच्या प्ले स्टोअरवरून आणि ॲपलला त्याच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्याची परवानगी द्यावी. याशिवाय, टेक कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप संच प्री-इंस्टॉल करण्यासही सांगण्यात आले आहे. ज्यामुळे युजर्सना या ॲप्सची माहिती मिळेल, आणि त्यांची काम अधिक लवकर होतील.

या नवीन योजनेच्या मदतीने सरकारला सरकारी सेवा आणि योजनांपर्यंत लोकांची पोहोच वाढवायची आहे. सध्या सर्व सरकारी ॲप्स स्वतंत्रपणे डाऊनलोड करावे लागतात. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सर्व ॲप्स एका संचामध्ये उपलब्ध असल्याने वापरकर्त्यांना ते डाऊनलोड करणं आणि हाताळणं अधिक सोपं होणार आहे.

Google आणि Apple तयार दिसत नाही

सरकारच्या या उपक्रमाकडे गुगल आणि ॲपलने अद्याप तयारी दर्शवली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलने या उपक्रमाला विरोध केला आहे आणि ऍपल देखील याबद्दल उत्साही नाही. दोन्ही कंपन्यांचे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ॲप्सवर बरेच नियंत्रण आहे. या येणाऱ्या महसुलातही त्याचा वाटा असतो. सरकारी ॲप्स सुरू केल्याने, कंपनीचे नियंत्रण तसेच महसूलाचा एक भाग गमावू शकतो.

अखेर प्रतिक्षा संपली! iPhone युजर्सना Truecaller मध्ये मिळणार हे कमाल फीचर, स्पॅम कॉल्सची कटकटही संपणार

सरकार कठोर भूमिका घेऊ शकते

कंपन्यांचा विरोध पाहता भारत सरकार कठोर भूमिका घेऊ शकते. या कंपन्यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2020 मध्येही सरकारने TikTok आणि Meta विरोधात कठोरता दाखवली होती. चीनसोबतच्या वादानंतर टिकटॉकसह अनेक चिनी ॲप्सवर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता सरकारच्या या योजनेला विरोध करणाऱ्या गुगल आणि ॲपलबाबत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Tech news now you can download all the government apps at one place know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स
1

Free Fire MAX: गेममध्ये Moco Store Live! कमी डायमंड्समध्ये मिळवा अल्ट्रा प्रिमियम रिवॉर्ड्स

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण
2

OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर
3

World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा
4

सावधान! भारतातील CCTV कॅमेऱ्यांच्या मोठ्या कंपन्यांवर बंदी? घर किंवा ऑफिससाठी कॅमेरा घेण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.