आता आरशात पाहा आणि फीट राहा! लवकरच लाँच होणार 'Smart Mirror', चेहरा वाचून सांगणार तुमचे हेल्थ अपडेट
एका फ्रेंच कंपनीने “Omnia” नावाचा स्मार्ट मिरर लवकरच लाँच होणार आहे. खरं तर स्मार्ट मिररपेक्षा याला जादूचा आरसा बोलणं, अधिक फायद्याच ठरणार आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी आरसा आहे. आपण कसे दिसत आहोत, यासाठी आपण आरशामध्ये बघतो. पण “Omnia” नावाचा स्मार्ट मिरर तुम्ही केवळ कसे दिसत आहात, एवढचं नाही तर तुम्ही यापेक्षा अधिक चांगले कसे दिसाल याबाबत सांगतो. थोडक्यात सांगायचं झालं तर “Omnia” नावाचा स्मार्ट मिरर तुमच्या हेल्थ अपडेटबद्दल माहिती देतो. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता आणि अधिक फीट राहू शकता.
iPhone च्या चार्जरची कटकट संपली, Portronics वायरलेस चार्जिंग स्टँड ठरेल उपयुक्त! केवळ इतकी आहे किंमत
Omnia स्मार्ट मिरर हा आरसा केवळ आपला मेकअप पाहण्यासाठी नसून तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. या आरशासमोर उभे राहून तुम्ही तुमचे वजन, हृदयाचे ठोके आणि शरीराची स्थिती जाणून घेऊ शकता. यात एक स्मार्ट सहाय्यक देखील आहे जो तुम्हाला सल्ला देतो आणि डॉक्टरांशी बोलण्यात मदत करतो. हा आरसा तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डॉक्टरांनाही पाठवू शकतो. म्हणजेच आरसा एक असला तरी तो अनेक कामांसाठी फायद्याचा ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Omnia स्मार्ट मिरर अद्याप बाजारात उपलब्ध करण्यात आलेला नाही. Omnia स्मार्ट मिररची चाचणी अजून सुरु आहे. हा स्मार्ट मिरर कधी बाजारात लाँच होईल, त्याची किंमत काय असेल याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र मिळालेल्या अहवालांनुसार Omnia स्मार्ट मिरर बाजारात येण्यास बराच वेळ लागू शकतो.
Omnia स्मार्ट मिररची सर्वात खास गोष्ट म्हणजे या आरशामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक तंत्रे एकत्र करण्यात आली आहेत. तथापि, असे स्मार्ट मिरर पूर्वी अस्तित्वात आहेत, जसे की लुलुलेमॉन्स मिरर. हे आरसे तुम्हाला वेगवेगळी माहिती दाखवू शकतात, व्हिडिओ कॉल करू शकतात आणि गाणी प्ले करू शकतात.
Withings कंपनी CES 2025 मध्ये हा आरसा सर्वांसमोर सादर करेल. यावरून हे स्पष्ट होईल की हा आरसा प्रत्यक्षात किती फायद्याचा ठरेल. हा आरसा बाजारात कधी उपलब्ध होईल, त्याची किंमत काय असेल याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.
Photography Tips: तुमचे फोटो कायम राहतील सेफ, फक्त लक्षात ठेवा या टीप्स
याव्यतिरिक्त, विथिंग्स स्मार्ट घड्याळे, स्मार्ट स्केल, कनेक्टेड ब्लड प्रेशर कफ, स्मार्ट थर्मामीटर आणि अगदी नॉन-इनवेसिव्ह स्लीप ट्रॅकर देखील ऑफर करते जे गादीखाली फीट बसते. या कंपनीने भूतकाळात अनेक नवीन प्रोडक्ट्स देखील लाँच केली आहेत, जसे की शौचालयात वापरले जाणारे यूरीन टेस्ट डिव्हाईस आणि पायांच्या माध्यमातून मज्जातंतूंच्या आरोग्याचे विश्लेषण करणारे स्केल. या कंपनीने आपल्या स्मार्टवॉचमध्ये कार्डिओलॉजिस्टद्वारे तपासलेले ईसीजी अहवालासारखी टेलिमेडिसिन वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत.