तुम्हालाही WhatsApp वर हा मॅसेज आलाय का? थांबा, ओपन करताच व्हाल रशियन हॅकर्सचे शिकार
तुम्ही देखील व्हॉट्सॲप युजर आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. व्हॉट्सॲपवर आपल्याला अनेकदा अनोळखी व्यिक्तींचे मॅसेज किंवा कॉल येत असतात. पण अशा कॉल्स किंवा मॅसेजना रिप्लाय करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा काही घटना देखील सध्या समोर येत असून कंपनीने याबाबत युजर्सना अलर्ट देत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार
कंपनीने सांगितलं आहे की, रशियन हॅकर्स व्हॉट्सॲप युजर्सना टार्गेट करत आहेत. हॅकर्स युजर्सना ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा मॅसेज पाठवून त्यांचं व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करत आहेत. तज्ज्ञांनी देखील व्हॉट्सॲप युजर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, जर तुम्हाला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले असेल तर सावधगिरी बाळगा. रशियन हॅकर्स अशा प्रकारे लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होऊ शकतं आणि तुमची सर्व वैयक्तिक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
मायक्रोसॉफ्टच्या नवीन अहवालानुसार, रशियन हॅकर्स ग्रुप कॅलिस्टो किंवा स्टार ब्लिझार्ड नावाने ग्रुप तयार करून लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा का अकाऊंटचा ॲक्सेस गमावला की लोकांना खूप नुकसान सहन करावे लागू शकते. त्यांची संपूर्ण माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते. आणि हॅकर्स या माहितीचा गैरवापर करण्याची देखील शक्यता आहे.
हॅकर्सचा हा गट रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसशी संबंधित आहे. हे हॅकर्स प्रथम अधिकारी किंवा नेता म्हणून लोकांशी संपर्क साधतात आणि त्यांचा विश्वास संपादन करतात. एकदा विश्वास प्रस्थापित झाल्यानंतर, ते फिशिंग ईमेल पाठवतात. लोक त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताच, ते हॅकर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेबसाइटवर पोहोचतात आणि येथे त्यांचे पासवर्ड चोरले जातात. आता हा ग्रुप लोकांच्या व्हॉट्सॲप अकाउंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. हॅकर्स आता लोकांना ईमेल पाठवण्याऐवजी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा मॅसेज पाठवत आहेत. याशिवाय ईमेलवर देखील व्हॉट्सॲपसंबंधित एक QR कोड शेअर केला जात आहे.
हॅकर्स क्यूआर कोडद्वारे लोकांच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. ईमेलमध्ये एक क्यूआर कोड दिलेला आहे. हॅकर्स हा क्यूआर कोड स्कॅन करून लोकांना व्हॉट्सॲप खाते उघडण्यास सांगतात. ज्यामध्ये सांगितलं जातं की, हा क्यूआर कोड व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधित आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा युजर्स हा क्यूआर कोड स्कॅन करतात तेव्हा हॅकर्सना युजर्सच्या मॅसेजचा अॅक्सेस मिळतो. असे केल्याने, वापरकर्त्यांच्या मॅसेजचा संपूर्ण प्रवेश हॅकर्सकडे जातो.
Jio, Airtel की Vi कोणत्या कंपनीचा अॅन्यूअल रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त? जाणून घ्या पूर्ण लिस्ट
या हॅकिंगच्या प्रयत्नाबाबत व्हॉट्सॲपने युजर्सला इशाराही दिला आहे. व्हॉट्सॲपच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नेहमी तुमचे अकाऊंट लिंक करा, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. कोणत्याही अनोळखी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नक.