Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp, Telegram आणि Instagram युजर्सवर स्कॅमर्सची नजर, सरकारने दिला अलर्ट! अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

सायबर ठग स्पॉन्सर्ड फेसबुक जाहिरातींद्वारे देशात लोकांची फसवूणक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स लोकांना सर्वाधिक टार्गेट करत आहेत. ज्यामुळे सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आ

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2025 | 10:36 AM
WhatsApp, Telegram आणि Instagram युजर्सवर स्कॅमर्सची नजर, सरकारने दिला अलर्ट! अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

WhatsApp, Telegram आणि Instagram युजर्सवर स्कॅमर्सची नजर, सरकारने दिला अलर्ट! अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी सरकारने अलर्ट जारी केला आहे. या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्कॅमर्सची नजर आहे. स्कॅमर्स व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम युजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आपण स्वत:ला सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

BSNL ने युजर्सना दिलं New Year Gift! लाँच केले दोन ढासू रिचार्ज प्लॅन, मिळणार फास्ट स्पीड इंटरनेट

व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम या ॲप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स लोकांना सर्वाधिक टार्गेट करत असल्याचे गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे. वास्तविक, या तिन्ही ॲप्सचे करोडो युजर्स आहेत. जगभरात या तिन्ही ॲप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मित्रांसोबत चॅटिंग करण्यापासून ते अगदी काही प्रोफेशल कामांपर्यंत या ॲप्सचा वापर केला जातो. त्यामुळे, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या स्कॅमर्सना लोकांची फसवणूक करणं अधिक सोपं होतं.  (फोटो सौजन्य – pinterest)

सर्वाधिक फसवणूक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होतेय

2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत सरकारला व्हॉट्सॲपद्वारे सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक 43,797 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर टेलिग्रामच्या माध्यमातून फसवणुकीच्या 22,680 तक्रारी आणि इन्स्टाग्रामद्वारे फसवणुकीच्या 19,800 तक्रारी आल्या. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, सायबर ठग गुगल सर्व्हिस प्लॅटफॉर्मचा वापर करून असे गुन्हे करतात. स्कॅमर्स अगदी साध्या सोप्या पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात, आणि त्यांची लाखो रुपयांची फसवूणक करतात.

या लोकांना सर्वाधिक टार्गेट केले जाते

देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान आलेल्या गृह मंत्रालयाच्या या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की अशा प्रकारची फसवणूक वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग आणि सायबर गुलामगिरीचाही समावेश आहे. सायबर फसवणुकीत बेरोजगार तरुण, गृहिणी, विद्यार्थी आणि इतर गरजू लोकांना सर्वाधिक टार्गेट केले जाते, ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा गमावला जातो. कर्ज घेतलेल्या पैशांचाही या पैशात समावेश आहे.

Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज

सरकार फेसबुकवरही लक्ष ठेवून आहे

अहवालात असे म्हटले आहे की सायबर ठग स्पॉन्सर्ड फेसबुक जाहिरातींद्वारे देशात बेकायदेशीर कर्ज देणारी ॲप्स सुरू करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, सरकार अशा लिंक्स आधीच ओळखते. गरज भासल्यास या लिंक्स काढून टाकण्याच्या सूचनाही फेसबुकला देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे लोकांची अशा जाहीरातींमुळे फसवणूक होणार नाही.

अशा प्रकारे स्वत:ला सुरक्षित ठेवा

  • तुमच्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही अनोळखी व्यक्तिकडून आलेली पीडीएफ आणि एपीके फाईल डाऊनलोड करू नका. कारण यामुळे तुमच्या फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल केला जाऊ शकतो.
  • कोणत्याही व्यक्तिसोबत तुमच्या बँक अकाऊंटचा नंबर किंवा पासवर्ड शेअर करू नका.
  • तुमच्या बँक अकाऊंटमधून असे कोणते व्यवहार झाल्याचे आढळले, जे तुम्ही केलेच नाहीत. तर त्वरीत तुमच्या बँकेला याबाबत माहिती द्या.
  • तुमची फसवूणक झाल्यास त्वरीत याबाबत पोलिसांत तक्रार करा.

Web Title: Tech news scammers are targeting whatsapp telegram and instagram users know how to stay safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
1

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
2

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
3

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
4

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.