Tech Tips: Youtube च्या Cooking चॅनेलवरील व्हिडीओ व्हायरल होत नाही? तुमच्या या चूका सुधारण्याची गरज
युट्यूबवर वेगवेगळे व्हिडीओ तयार करणे आणि या व्हिडीओमधून कमाई करणं हे हल्ली अनेकांचं स्वप्न आहे. युट्यूबवर तुम्ही अनेक चॅनेल पाहिले असतील. काही चॅनेल शिक्षणासंबंधित असतात, तर काही कुकींग संबंधित. कॉमेडी, शिक्षण, आर्टिस्ट, असे चॅनेल युट्यूबवर सहज व्हायरल होतात. पण अनेकदा कुकींग चॅनेल्सला स्ट्रगल करावं लागतं. काही चुकांमुळे कुकींग चॅनेल्स व्हायरल होत नाही. यूट्यूबवर कुकिंग चॅनेल व्हायरल न होण्याची अनेक कारणे असू शकतात. जर तुम्ही कूकिंग चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ते योग्य प्रकारे कसे बनवायचे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे समजून घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
IRCTC DOWN: IRCTC ची सेवा पूर्वरत, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डाऊन होती वेबसाइट
स्वयंपाक ही एक कला आहे, यामध्ये अनेक प्रकार समाविष्ट आहेत. तुम्ही यूट्यूबवर कुकिंग चॅनेल तयार करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुम्हाला एक विशेष Niche निवडावी लागेल. यामुळे तुमचे चॅनल अधिक आकर्षक दिसेल. तुम्ही कोणताही एक Niche निवडू शकता. तुम्ही तुमच्या चॅनेलची श्रेणी निवडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला शाकाहारी, मांसाहारी, मिठाई, केक किंवा सॅलड यासारखा कंटेट तयार करायचा आहे.
याशिवाय, तुम्ही स्वयंपाकाची शैली देखील निवडू शकता, जसे की घरगुती स्वयंपाक, रस्त्यावरचा स्वयंपाक किंवा गावातील शैलीचा स्वयंपाक. एकदा तुम्ही तुमचा Niche ठरवल्यानंतर, तुमच्या दर्शकांना तुमच्या चॅनेलवर काय अपेक्षित आहे हे कळेल, ज्यामुळे तुम्हाला एक निष्ठावंत फॅनबेस तयार करता येतील.
सुरुवातीला तुम्हाला महाग सेटअपची आवश्यकता नाही. तुमच्याकडे चांगला स्मार्टफोन, ट्रायपॉड आणि माइक असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्मार्टफोनवरून शूट करू शकता. त्याचबरोबर चांगला ट्रायपॉड 300-1500 रुपयांना बाजारात सहज उपलब्ध आहे. 700-1000 रुपयांना चांगल्या दर्जाचा माइक उपलब्ध आहे. स्वयंपाकघरातील एक स्वच्छ आणि सुंदर कोपरा निवडा जिथे तुम्ही व्हिडिओ शूट कराल. प्रकाशाकडे लक्ष द्या जेणेकरून व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दिसेल.
रेकॉर्डिंग करताना आत्मविश्वास बाळगा. कॅमेरा उजव्या कोपऱ्यात सेट करा जेणेकरून स्वयंपाक करण्याची प्रक्रिया आणि तुमचे सादरीकरण दोन्ही दिसतील. व्हिडिओ आकर्षक बनवण्यासाठी, तुम्ही Kinemaster, Inshot, Youcut किंवा VN सारखे एडिटींग ॲप वापरू शकता. लक्षात ठेवा की कमाईसाठी मोठे व्हिडिओ अधिक फायदेशीर आहेत.
एकदा व्हिडिओ तयार झाल्यानंतर, युट्यूब चॅनेल तयार करण्याची वेळ आली आहे. तुमचा Gmail आयडी वापरून युट्यूबमध्ये साइन इन करा आणि तुमच्या कंटेटसोबत जुळणाऱ्या चॅनेलच्या नावाचा विचार करा. व्हिडिओ अपलोड करताना टायटल, डिटेल्ड डिस्क्रिप्शन आणि रिलेटेड टॅग वापरा. या तीन गोष्टींमुळे तुमचा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. थंबनेलवर देखील विशेष लक्ष द्या. थंबनेल असा असावा की त्यावर क्लिक करण्यापासून प्रेक्षक स्वतःला रोखू शकत नाहीत.
आता प्रश्न पडतो की चॅनलची कमाई कशी सुरू होईल? युट्यूबवर कमाई करण्यासाठी, तुम्हाला काही मॉनेटाइजेशन पूर्ण करावे लागतील. तुमच्या चॅनेलवर तुमच्याकडे किमान 1000 सूस्क्राईबर्स आणि 4000 तास वॉच टाइम असणे आवश्यक आहे. तुम्ही शॉर्ट्स तयार केल्यास, 90 दिवसांत 10 मिलीयन व्ह्यूज आवश्यक आहेत. या अटी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही कमाईसाठी अर्ज करू शकता.
Apple ने थांबवलं या गॅझेटचं प्रोडक्शन! काय आहे कारण, जाणून घ्या सविस्तर