तुम्हालाही सतत स्मार्टफोनचा पासवर्ड विसरण्याची सवय आहे? टेंशन सोडा आणि आत्ताच ऑन करा ही सेटिंग
प्रत्येकजण आपला स्मार्टफोन सुरक्षित राहावा यासाठी पासवर्डची मदत घेतो. स्मार्टफोन असो, लॅपटॉप, वाय-फाय कनेक्शन असो किंवा कोणतेही ॲप, प्रत्येक ठिकाणी आपण एक विशिष्ट पासवर्ड सेट केलेला असतो. या पासवर्डशिवाय स्मार्टफोन असो, लॅपटॉप, वाय-फाय कनेक्शन असो किंवा कोणतेही ॲप ओपन केले जाऊ शकत नाही. पण कधी आपण हा पासवर्डचं विसरलो तर?
असं अनेकदा होतं की आपण स्मार्टफोनचा किंवा एखाद्या ॲपचा पासवर्ड विसरतो आणि पासवर्ड कशा पद्धतीने रिस्टोअर करावा हेदेखील आपल्याला माहिती नसतं. आपल्याकडे पासवर्डचा ढीग असतो, अशावेळी आपण प्रत्येक ठिकाणी कोणता पासवर्ड ठेवला आहे, हे लक्षात ठेवणं फार कठीण आहे. आपण आपल्या फोनचा पासवर्ड विसरतो तेव्हा सर्वात मोठी समस्या उद्भवते. तुमच्या या समस्येवरही आम्ही उपाय शोधला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर आपण आपल्या स्मार्टफोनचाच पासवर्ड विसरलो तर आपण कोणतंही काम करू शकणार नाही. कारण पासवर्डशिवाय आपला स्मार्टफोन सुरु होण फार अवघड आहे. पण अशावेळी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक सेटिंग केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये हे सेटिंग आधीच चालू केले असेल तर पासवर्डची समस्या तुम्हाला पुन्हा येणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त ही सोपी स्टेप फॉलो करावी लागेल.
येथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हे सर्व पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावाने दिलेले असू शकतात. तुम्ही तुमच्या डिव्हाइसनुसार प्रक्रिया फॉलो करू शकता आणि फोन अनलॉक करू शकता.