फालतू शॉपिंगला बसणार आळा! AI मॅनेज करणार तुमच्या क्रेडीट कार्डचा खर्च, CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’
आजच्या काळात AI आपल्याला आपल्या सर्व कामांसाठी मदत करत आहे. AI ने इतकी प्रगत केली आहे की, ते आपल्यासोबत एखाद्या माणसांप्रमाणे संवाद देखील साधू शकतं. आता AI तुम्हाला तुमचे खर्च मॅनेज करण्यासाठी देखील मदत करणार आहे. होय, हे खरं आहे. आता AI मुळे आपल्या फालतू शॉपिंगला आळा बसणार आहे. AI आपल्याला आपले क्रेडीट कार्ड खर्च मॅनेज करण्यासाठी मदत करणार आहे. जे लोकं आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेऊ शकत नाही, आणि ज्यांना सतत काही ना काही खरेदी करण्याची इच्छा असते, अशा लोकांसाठी हे AI फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याविषयी आता अधिक जाणून घेऊया.
अनेक कंपन्यांनी त्यांच्या कामांमध्ये AI चा वापरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत, वापरकर्त्यांना फक्त AI-शक्तीवर चालणारी फीचर्स मिळत होती, परंतु आता वापरकर्त्यांना AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट देखील मिळणार आहेत, जे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करणार आहे. CheQ नावाच्या कंपनीने भारतातील पहिले AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट लाँच केले आहेत. CheQ Wisor, असं या AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टचं नाव आहे. CheQ Wisor प्रत्येक क्रेडीट कार्ड युजरसाठी फायद्याचं ठरणार आहे. AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट नेमंक काय आहे आणि ते आपली कशी प्रकारे मदत करू शकतो, याबद्दल अनेकांना शंका आहे. चला तर मग या AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
CheQ नावाच्या कंपनीने CheQ Wisor नावाचे एक नवीन टूल लाँच केले आहे. हे भारतातील पहिले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट आहे. हे टूल तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल क्रेडिट कार्ड वापरकर्त्याच्या मदतीसाठी डिझाइन केले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की हे टूल वापरकर्त्यांना रिअल-टाइम सहाय्य प्रदान करून आणि क्रेडिट वापराचे विश्लेषण करून क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी मदत करेल.
CheQ Wisor 25-45 वर्षे वयोगटातील लोकांना मदत करण्यासाठी खास तयार करणयात आलं आहे. AI पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टच्या मदतीने, युजर्स स्मार्ट आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होतील आणि त्यांचे क्रेडिट कार्ड अधिक प्रभावीपणे वापरतील. हे AI-शक्तीवर चालणारे टूल वापरकर्त्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड कसे वापरायचे याबद्दल शिफारसी देखील प्रदान करते.
BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट